rajkiyalive

vishal patil news : जयश्रीताईंचा भाजप प्रवेश निर्णय अनैसगिर्र्क खासदार विशाल पाटील

vishal patil news : जयश्रीताईंचा भाजप प्रवेश निर्णय अनैसगिर्र्क खासदार विशाल पाटील: जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक आहे. लोकांना त्यांचा हा निर्णय रुचणार नाही. काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी आमच्या कुटूंबाची इच्छा आहे. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी कोणाच्या दबावाने घेतला, हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल असे मत सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

vishal patil news : जयश्रीताईंचा भाजप प्रवेश निर्णय अनैसगिर्र्क खासदार विशाल पाटील

काँग्रेस विचारधारेच्या विरोधात जाऊ नये

विधानसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसने पक्षातून निलंबीत केले होते. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्या चर्चाही अंतीम टप्प्यात आल्या असतानाच सोमवारी त्यांनी अचानक पणे भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी श्रीमती पाटील यांची त्यांच्या ‘विजय’ बंगल्यावर जात भेट घेतली. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खुला केला. बुधवारी मुंबई मध्ये त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.

vishal-patil-news-jayashrees-decision-to-join-bjp-is-unethical-mp-vishal-patil

याबाबत खासदार विशाल पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक युती ठरेल. त्यांनी कोणाच्या दबावातून हा निर्णय घेतला माहित नाही. पण लोकांना हा निर्णय रुचणार नाही. वसंतदादा घराणे काँग्रेसच्या विचारांशी ठाम आहे. या विचारांच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी कुटूंबाची इच्छा आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा करु असेही खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यालाही भाजप प्रवेशाची ऑपर दिली आहे, पण आपण कुठेही जाणार नाही असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

जयश्रीताईंचा निर्णय धक्कादायक
काँग्रेसचे नेते तथा आमदार विश्वजीत कदम म्हणाले, जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या निर्णयावर ठाम राहिल्या तर पुढे काय करायचे याचाही विचार केला जाईल. खासदार विशाल पाटील आणि मी एकत्रच आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही असेही आमदार कदम यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज