vishal patil news : कौटुंबिक अडचण असल्याने जयश्रीताईंचा प्रचार…
vishal patil news : कौटुंबिक अडचण असल्याने जयश्रीताईंचा प्रचार… : सांगली विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी उभे राहू नये, अशी विनंती त्यांना वारंवार मी केली होती. तरी देखील त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. त्यांची समजूत काढण्यात मी अपयशी ठरलो. कौटुंबिक अडचण असल्यामुळे त्यांचा पाठीशी राहिलो.
पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी स्वाभाविक आहे. त्यांच्या भावना समजू शकतो. पण पुन्हा असे होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू, असे खा. विशाल पाटील यांनी सांगितले. शिवाय जयश्री पाटील यांच्या निलंबनाची निर्णय आ. विश्वजीत कदम घेतील.
अमित शहांचे वक्तव्य दुर्दैवी
संविधान बदलण्याचा घाट भाजपने आखल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांना जनतेने चपराक दिली होती. आता संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. लोकसभा संविधानाचे मंदिर आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे उचित आहे. पण त्यांनी चुकीचे वक्तव्य केले. या प्रकरणी अमित शहांनी माफी मागावी, राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. ‘मनुस्मृर्ती’ची ही दादागिरी सुरू असल्याचा आरोप खा. विशाल पाटील यांनी केला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



