rajkiyalive

विशाल पाटलांना विधानपरिषद अन् राज्यसभेची ऑफर

जनप्रवास । प्रतिनिधी
विशाल पाटलांना विधानपरिषद अन् राज्यसभेची ऑफर : सांगली ः महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा झेंडा फडकावणारे काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभेला भिडणार की विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्विकारून त्यांचे थंडावणार, याचा फैसला सोेेमवारी होईल. तत्पूर्वी आमदार विश्वजीत कदम आणि विशाल यांच्यावर प्रदेश आणि राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला आहे. सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द देण्यात आला आहे.

विशाल पाटलांना विधानपरिषद अन् राज्यसभेची ऑफर

सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज माघारीला अवघे काही तास बाकी आहेत. महायुतीत भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसवर अन्याय झाल्याचा आरोप करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. या स्थितीत भाजप विरुद्ध बंडखोर अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हट्टून घेतलेली सांगलीची जागा काँग्रेसच्या मदतीशिवाय लढवताना शिवसेनेची दमछाक होताना दिसते आहे.

राष्ट्रवादीतील अनेक गट शिवसेनेसोबत यायला तयार नाहीत.

अशावेळी विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेणे हाच पर्याच महाविकास आघाडीने निवडला आहे. त्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला जातोय. आता विश्वजीत यांची भूमिका काय राहते, याकडेही लक्ष असणार आहे.विशाल पाटील यांनी माघार घेतली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही, अशी भूमिका घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे माघारीचा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला असेल.

विशाल पाटील बंडावर ठाम

विशाल पाटील यांची कोंडी केली जात असल्याच्या भावनेतून रविवारी जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस कमिटीत आले होते. गटागटाने त्यांनी विशाल यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत मागे फिरू नका, असे आवाहन त्यांना केले. विशाल पाटील यांनी आपण लढण्यावर ठाम असल्याचे सांगत होते. पक्षाच्या दबावापेक्षा मतदारसंघातील लोकांचा लढण्यासाठीचा दबाव मोठा असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

तर निलंबनाची कारवाई; प्रदेश काँग्रेसकडून ’मेसेज’!

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबावतंत्राचा वापर सुरू आहे.

प्रदेश काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांना मेसेज देण्यात आला आहे.

बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात आला आहे.  त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी विशाल पाटील (तळीहरश्र झरींळश्र) यांनी माघारीबाबत अजून कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यात सांगलीच्या जागेसाठी मतदान होणार असून उद्या 22 एप्रिल हा उमेदवारी माघारीसाठी शेवटचा दिवस आहे.

त्यामुळे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने विशाल पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात? याची उत्सुकता आहे.

सांगलीमध्ये अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये पूर्णतः सक्रिय नसल्याने सुद्धा ठाकरे गटामध्ये नाराजी आहे. दुसरीकडे विशाल पाटील यांना भाजपच्या दोन माजी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, आघाडी धर्म पाहता विशाल पाटील यांना प्रदेश काँग्रेसकडून माघार घेण्यासाठी माघार घेण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिल्यास चंद्राहार पाटील सांगलीच्या लढतीत तिसर्‍या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि संजय पाटील अशीच लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना थांबवण्यासाठी आता प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज