vita drugs news : विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी विट्यातील महिलेला केली अटक : पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून कारखाना दिला भाड्याने. : सांगली : खानापूर तालुक्यातील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमधील माऊली इंडस्ट्रीज बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना भाड्याने दिल्याबद्दल विट्यातील एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. गोकुळा विठ्ठल पाटील (वय 47, रा. पाटीलवस्ती, विटा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
vita drugs news : विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी विट्यातील महिलेला केली अटक : पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून कारखाना दिला भाड्याने.
कार्वे औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रिज हा कारखाना गोकुळा पाटील यांच्या मालकीचा आहे. कारखान्याची जागा 2020 मध्ये जावळे नामक व्यक्तीने गोकुळा पाटील यांना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित केली होती. या जागेत तार, खिळे तयार करण्याची परवानगी पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडे परवानगी घेतली होती. मात्र कारखाना सुरू केला नसल्याने महामंडळाने त्यांना दीड वर्षापूर्वी नोटीस बजावली होती.
एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरिचा, बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितले होते. शेड भाड्याने मागणार्या बलराज कातारी याच्याकडे कोणत्याही व्यवसायाचा परवाना नाही. याची खात्री न करता करारपत्र केले. भाडे करार अधिकृत केला नाही. तसेच औद्योगिक विकास महामंडळाला याची कोणतीच कल्पना दिली नाही. कारखान्यात केमिकल्सचा वापर आणि परफ्युमचे उत्पादन करणार असल्याचे सांगितले असले तरी प्रदुषण नियंत्रण मंडळाला देखील याची माहिती दिली नाही.
त्यांची कोणतीही परवानगी नव्हती. गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे त्याठिकाणी संशयितांनी एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी रात्री अटक केली. अटकेपूर्वी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी विटा येथे येऊन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटक केली.
पाचशे रूपयाच्या स्टॅम्पवर झाला करार…
कोट्यवधी रुपयाचे ड्रग्ज बनवणार्या कारखान्याचा गोकुळा पाटील यांनी पाचशे रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर करार केला होता. या करारावर कोणत्याही साक्षीदाराची सही नाही. तसेच कराराचे कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन केलेले नाही. तसेच कराराच्या तारखेमध्येही फेरफार केला आहे. पोलिस तपासात या सर्व बाबी निदर्शनास आल्या आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



