rajkiyalive

vita news : लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलिंडरचा स्फोट, माध्यान्ह आहार शिजवताना झाला स्फोट

vita news : लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलिंडरचा स्फोट, माध्यान्ह आहार शिजवताना झाला स्फोट : खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेत माध्यान्ह आहार शिजवताना गॅस सिलेंड रचा स्फोट झाला. ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लेंगरे येथील गुजलेवस्ती शाळेत माध्यान्ह आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला.

vita news : लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलिंडरचा स्फोट, माध्यान्ह आहार शिजवताना झाला स्फोट

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे. याच शाळेत अंगणवाडीचे वर्ग ही भरविले जातात. आज मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे स्वप्नाली संतोष गायकवाड या माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी गेल्या. तेथे डाळी शिजवण्यासाठी गॅस सुरु केला असता या गॅसच्या शेगडीतून वेगळाच आवाज येऊ लागल्याने गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या.

त्याचवेळी मोठा जाळ झाला. त्यावर गायकवाड यांनी तातडीने बाहेर पडत आणि प्रसंग अवधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. याच दरम्यान, जाळ वाढत असतानाच गॅसच्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला, स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले. मोठा स्फोट झाल्याने आसपासच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली. लोकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

स्फोट झाल्याची माहिती समजताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली.

तसेच सरपंच लक्ष्मीबाई पाटील, माजी अध्यक्ष सुनिल पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड आणि एजाज देसाई यांनी या ठिकाणी भेट देत स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरु केले. तासाभरानंतर आग विझविण्यात यश आले. उपसरपंच जाकीर पठाण, सुरेश चिंचणकर, माजी सरपंच प्रशांत सावंत, शकील शेख, हर्षवर्धन बागल यांनी याठिकाणी भेट दिली.

या शाळेत स्वप्नाली गायकवाड या आचारी मध्यान भोजन शिजवण्याचे काम करतात.

आग लागल्याचे दिसताच त्यांनी शाळेच्या आवारात आलेल्या चिमुकल्यांना तात्काळ बाहेर काढले. परिणामी पुढचा अनर्थ टळला. आचारी असलेली स्वप्नाली गायकवाड हिने स्वतः चा जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाली, मात्र शाळेचे आवारामध्ये प्राथमिक शाळेची, अंगणवाडीची चिमुकली आलेली दिसताच क्षणाचाही विलंब न करता तिने तात्काळ त्या चिमुकल्यांना शाळेच्या आवाराबाहेर काढले. होती आचारी, म्हणून वाचली बिचारी अशी चर्चा लेंगरे गावांत सुरु आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज