rajkiyalive

WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

जनप्रवास वारणावती 🙁 हिंदुराव पाटील )

WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असुन गेल्या 24 तासात 110 मिलीमिटर अतिवृष्टीचा पाऊस पडला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता मंगळवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या दोन वक्राकार दरवाजातून 2000 क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 1648 क्युसेक असा एकूण 3648 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात आला होता.

WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

दुपारी चार वाजता दोन वक्राकार दरवाज्यातून 2200 व वीजनिर्मिती केंद्रातून 1600 असा एकूण 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यामुळे वारणा नदीला पुर आला आहे.पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास विसर्गात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या 24 तासात धरण परिसरात 110 मिलीमिटर अतिवृष्टीचा पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.

धरणात येणार्‍या पाण्याची आवक 17 हजार 153 क्युसेक असून धरणात 29 टिएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरण 84 टक्के भरले आहे. आजअखेर धरण परिसरात एकूण 1779 मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी 620.30 मीटरवर पोहचली आहे. परिसरात पडत असणार्‍या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत आहे. नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली गेली आहे.

मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळुन पडलेली आहेत.परिसरातील विद्युत पुरवठा बंद अवस्थेत आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज