rajkiyalive

कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी

कासेगाव  वार्ताहर

कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी :   कासेगाव येथील पिढ्यान पिढ्याचा मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूल करण्याचा प्रश्न येत्या काही महिन्यात मार्गी लावू,असा विश्वास व्यक्त करीत आपण सर्वांनी त्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत सहकार्य करावे,असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी सांगली येथील बैठकीत केले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,वाळवा प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास,तहसिलदार प्रदीप उबाळे,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी

    आ.पाटील म्हणाले,ही मंडळी चार-पाच पिढ्यापासून या जागेत राहत आहेत. गेल्या २५ वर्षापासून आम्ही ही घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सर्व मागासवर्गीय आणि बहुतेक भूमिहीन मजूर कुटुंबे आहेत. हा प्रश्न लवकरात-लवकर सुटायला हवा. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
      डॉ.दयानिधी म्हणाले,आपण गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करीत आहात. मात्र प्रश्न सुटलेला नाही. मी माझ्या अधिकारात हा प्रश्न काही महिन्यात मार्गी लावू शकतो. आपण सर्वांनी यातील तांत्रिक बाबी समजून घेत प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
      तत्पूर्वी देवराजदादा पाटील,विश्वनाथ पाटसुते यांनी हा विषय आणि तो सोडविण्या साठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देताना हा प्रश्न विनामूल्य तातडीने  सोडवावा, अशी मागणी केली. याप्रसंगी कासेगाव येथील यशवंत कॉलनीतील घरांची नोंद मालमत्ता पत्रकात करणे आणि येवलेवाडी येथील चुकीच्या सिटी सर्व्हेबाबतही चर्चा करण्यात आली.
      यावेळी सरपंच सौ.कल्पना गावडे,माजी सरपंच किरण पाटील,उपसरपंच सुजित पाटील,ग्रामसेवक राहुल सातपुते,तलाठी अभिजीत पाटील,राजू तेली,ग्रामपंचायत सदस्या सौ.दिपाली मिसाळ,पोलीस पाटील माणिक बडेकर,बापूराव बडेकर,माजी ग्रा.प. सदस्य हणमंत मिसाळ,नामदेव पाटसुते, अधिक मिसाळ,विजय पाटसुते,रामभाऊ वायदंडे,वसंत माने,नारायण भुत्ते,दिनकर जाधव,निवास जाधव,येवलेवाडीचे पोपटराव जगताप,उपसरपंच मयूर जगताप,दिपक जगताप,संतोष जगताप,अनिल जगताप यांच्यासह संबंधित कार्यकर्ते उपस्थित होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज