rajkiyalive

yadravkar news : यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर 

yadravkar news : यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर  : शिरोळ तालुका ही माझी कर्मभूमी असली तरी यड्राव हे गाव माझी जन्मभूमी आहे. या गावाने आमच्या घराण्याला कायमच सहकार्य केले आहे. या गावचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, त्यांच्या ऋणात राहणे मी कायम पसंत करेन, असे भावनिक आवाहन राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

yadravkar news : यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर 

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या मूळ गावी यड्राव येथे मतदारांशी संवाद साधला. गावात त्यांचे आगमन झाल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. गावातून प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी संपन्न झाली. यावेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. मतदारांनी या प्राचार रॅलीला मोठा प्रतिसाद दिला. येथील दर्गा चौकात सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.स्वागत सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी सतिश मलमे, माधुरी टाकारे, विजय भोजे, रणजित पाटील, मुकूंद गावडे, उपसरपंच वैशाली साळोखे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, महावीर पाटील, औरंग शेख व मुस्लीम समाजातील बांधव, जीवंधर मूरचुटे, विजय पाटील, सरदार सुतार, लक्ष्मीकांत लड्डा, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, अनिल स्वामी, सुधीर आदमाने, दत्ता साळोखे, औरंग शेख, परसू कत्ती, सचिन मगदूम, शिवाजी दळवी शिवाजी निंबाळकर प्रदीप कोळी पुरंदर मगदूम सुकुमार क्षीरसागर, आनंदात साने, रोहित कदम, प्रकाश अकिवाटे, सुजित गरड, शिवाजी पाटील, मोहन प्रभावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज