rajkiyalive

zp election 2025 : प्रभाग रचना करण्याचे निवडणूक विभागाला आदेश, खानापूर झेड. पी.चा नवीन गट,

🗳️प्रभाग रचना करण्याचे निवडणूक विभागाला आदेश, खानापूर झेड. पी.चा नवीन गट, पंचायत समितीचे 122 गण

राजकीय लाईव्ह | सांगली | १३ जून २०२५

zp election 2025 : प्रभाग रचना करण्याचे निवडणूक विभागाला आदेश, खानापूर झेड. पी.चा नवीन गट, : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी : राज्यभरातील ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा गती घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (गट) आणि गण (प्रभाग) रचनेच्या प्रक्रियेस अधिकृत मान्यता दिली आहे. सांगली जिल्ह्यातही या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, एकूण ६१ जिल्हा परिषद गट व १२२ पंचायत समिती गणांची नव्याने रचना केली जाणार आहे.

 

📍 सांगली जिल्ह्यातील नव्या गट रचनेचा आराखडा

शासनाच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या, भौगोलिक स्थिती व मागील निवडणूक क्षेत्रांनुसार गटांची विभागणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका लवकरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या 68 असलेली गटांची संख्या आता 61 झाली आहे. खानापूर जिल्हा परिषदेचा नवीन गट आणि बलवडी आणि करंजे या दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. दि. 14 जुलैपर्यत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या वर्चस्वासाठी राजकीय वातावरण तापणार असून दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येते.

राज्य शासनाने महापालिका आणि नगरपंचायत, नगरपरिषेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दि. 10 जून रोजी दिले होते, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्याचे डोळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेकडे लागले होते. गुरूवारी रात्री ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश दिले. 2017 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी झेडपीचे 60 गट आणि पंचायत समितीचे 120 गण होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपली होती. ओबीसी आरक्षण आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गट आणि गणांची नव्याने प्रभाग रचना केल्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

गेल्या तीन वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेच्या कारणामुळे वेळेत निवडणूक झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदचे 68 आणि पंचायत समित्यांचे 136 गणांची रचना केली. त्यानुसार आरक्षणाची सोडतही काढण्यात आली. मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक विभाग, निर्वाचन गणाची रचना करीत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागीले, त्या गट आणि गणास देय असलेली एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार निवडणूक जिल्हा परिषद गट व गणाची सदस्य संख्या निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते, याशिवाय जिल्हा परिषद गट व गणाच्या सरासरी लोकसंख्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त ठेवता येईल.

आता शासनाच्या नव्या आदेशानुसार 68 गटांची संख्या 61 करण्यात आली आहे. गत निवडणुकीपेक्षा एक नवीन गट आणि पंचायत समितीचे दोन नवीन गण तयार झाले आहेत. खानापूर तालुक्यात यापूर्वी नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी असे तीन गट होते. आता नव्याने खानापूर मतदारसंघ आणि बलवडी व करंजे या दोन गणांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या रचनेनुसार 61 गट आणि 122 गणांत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रभाग रचना करताना 2017 मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रचना करताना शक्यतो ग्रामपंचायतीचे विभाजन होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गटांची आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना दि. 14 जुलैपर्यंत प्रसिद्ध करण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध केलेल्या हरकतीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सूचना सादर करण्यासाठी दि. 21 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. प्राप्त हरकतीच्या आधारे जिल्हाधिकारी आपला अभिप्रायासह प्रस्ताव दि. 28 पर्यत विभागीय आयुक्तांना देतील. दि. 11 ऑगस्टपर्यत आलेल्या सूचनांवर आणि हरकतीवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय घेतील. दि. 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यतेसाठी जिल्हाधिकारी प्रस्ताव सादर करतील.

महापालिकेच्या अगोदर झेडपीची रणधुमाळी

महापालिकेच्या प्रभाग रचनेस अंतिम प्रसिद्ध देण्यासाठी दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेेंबरपर्यत मुदत देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेस दि. 18 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुक होण्याचे संकेत आहेत. गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

-तालुकानिहाय जिल्हा परिषद गटांची संख्या:

तालुका गट गण
आटपाडी 4 8
जत 9 18
खानापूर 4 8
कडेगाव 4 8
तासगाव 6 12
क.महांकाळ 4 8
पलूस 4 8
वाळवा 11 22
शिराळा 4 8
मिरज 11 22
एकूण 61 122

 

⏱️या कालावधीत होणार प्रभाग रचना

प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे ः 14 जुलैपर्यत
– जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती व सूचना करणे ः 21 जुलैैपर्यंत
– हरकतीवर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव देणे ः 28 जुलैपर्यंत
– हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे ः 11 ऑगस्टपर्यंत
– अंतिम प्रभाग रचनेस प्रस्ताव सादर करणे ः 18 ऑगस्ट


📌 निवडणुका लवकरच?

या प्रक्रियेनंतर निवडणूक आयोग निवडणुकीची अधिसूचना कधीही जाहीर करू शकतो. त्यामुळे राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. आरक्षण, प्रभाग सीमांकन आणि नव्या राजकीय संधी यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


🗣️ राजकीय लाईव्ह विश्लेषण

ही रचना केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर पुढील ५ वर्षांसाठी ग्रामीण विकासाचे स्वरूप ठरवणारी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची रचना काटेकोरपणे, लोकशाही मूल्य जपत आणि समाजघटकांचे योग्य प्रतिनिधित्व पाहून केली जाणे अत्यावश्यक आहे.


📢 पुढील अपडेटसाठी वाचा – राजकीय लाईव्ह
तुमच्या गावात काय घडतंय? तुमचा प्रभाग कसा बनतोय? अपडेट्स, विश्लेषण आणि थेट राजकारणाचे मैदान – सर्व काही इथेच!


✍️ दिनेशकुमार ऐतवडे
📲 संपर्क : 9850652056

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज