माधवनगर येथे व्यापार्याच्या दुचाकीसह अडीच लाखांची रोकड केली लंपास
परप्रांतीय कामगारांचे कृत्य : दोघांवर गुन्हा दाखल. माधवनगर येथे व्यापार्याच्या दुचाकीसह अडीच लाखांची रोकड केली लंपास :सांगली : माधवनगर येथील जकातनाक परिसरात असणार्या भंगार व्यापार्याची मोपेड दुचाकी आणि गाडीत ठेवलेली 2 लाख 29 हजारांची रोकड असा मुद्देमाल परप्रांतीय कामगारांनी लंपास केला. सदर चोरीची घटना हि बुधवार दि. 03 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.