
क्राईम डायरी
tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू
tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू : तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत नियमांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. प्रशासनाच्या नाकावर टिचून नियम फाट्यावर मारून शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत बैलगाडीवरील ताबा सुटल्याने बैलजोडी मणेराजुरी हद्दीतील तलावात गेली. बैलांना कासरा व सापत्यांचा फास लागला. त्यामुळे तलावात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाला.