rajkiyalive

jayant patil : रायफल्या-शंभू बैलजोडी ठरली वन बीएचके प्लॅटचा मानकरी

जयंत केसरी बैलगाडी शर्यत

jayant patil : रायफल्या-शंभू बैलजोडी ठरली वन बीएचके प्लॅटचा मानकरी कासेगाव ता.वाळवा येथील ऐतिहासिक,अद्भुत आणि अविस्मरणीय ’जयंत केसरी बैलगाडी शर्यती’ च्या दुसर्‍या पर्वाच्या प्रथम क्रमांकाच्या वन बीएचके फ्लॅटचा मानकरी पै.सचिनशेठ चव्हाण वाई यांचा ’रायफल्या 8181’आणि उमेशशेठ हरफळे, अमितशेठ पाडळी, अधिक पैलवान कळंबी यांचा ’शंभू’ही जोडी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी स्वतः दोन-अडीच तास बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार पहात विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले.

 

jayant patil : रायफल्या-शंभू बैलजोडी ठरली वन बीएचके प्लॅटचा मानकरी

मुख्य संयोजक, युवा उद्योजक अतुल लाहिगडे, जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, इस्लामपूरचे माजी नगरसेवक खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण राज्यातील लाखो बैलगाडी शर्यती शौकिनांनी हा बैलगाडी शर्यतींचा थरार याची डोळा, याची देही पाहिला. देशाच्या, राज्याच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात कासेगावची बैलगाडी शर्यत सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल असे गौरवोद्गार आ.जयंतराव पाटील काढले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंग नाईक, रणधीर नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.

दुसर्‍या क्रमांकाचे 6 लाख 6,265 चे बक्षीस अमोल पैलवान वाटेगावकर यांचा ’सर्जा’ आणि किरण राऊत बदलापूर,निखिल काळे येरवळेकर यांचा ’हरण्या’यांनी, तिसर्‍या क्रमांकाचे 3 लाख 6,265 चे बक्षीस पिंटूशेठ मोडक, वडकी व अजयशेठ पाटील, दरंगा यांचा ’कॉकटेल’, जगदीशबापू शिंदे ऊरळी देवाची यांचा ’पिस्टल’ यांनी चौथ्या क्रमांकाचे 2 लाख 6,265 चे बक्षिस अक्षय मोरे सातारा, राजू पाटील वाटेगाव यांचा ’बलमा’, व मोहीलशेठ धुमाळ,सुसगाव सचिनशेठ घरत यांचा ’बकासुर’ यांनी, पाचव्या क्रमांकाचे 1 लाख 6,265 चे बक्षीस नितीनआबा शेवाळे हडपसर यांचा ’बावर्‍या’,आणि ऋषभ गावडे नाशिक यांचा ’गुरू’ यांनी, सहाव्या क्रमांकाचे 62 हजार 65 चे बक्षिस पंकज घाडगे शिरसवडी यांचा ’रायफल’, मोहन मदने पेठ यांचा ’राजा’ यांनी, सातव्या क्रमांकाचे 62 हजार 65 चे बक्षिस विजय मदने, संजय मदने नातेपुते यांचा ’सरदार’आणि आनंदशेठ, वैभवशेठ, सर्वेशशेठ पाटील यांचा ’वादळ’यांनी, आठव्या क्रमांकाचे 50 हजार 6,265 चे बक्षीस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन महादेवनगरकर यांचा ’सरदार’व पप्पू ड्रायव्हर इस्लामपूर यांचा ’सर्जा’यांनी जिंकले आहे.

 

 

सुनिल मोरे पेडगाव, चंदू कोकाटे वडूज, प्रकाशबुवा महागावकर, रणजित बनसोडे बांबवडे, प्रविण घाटे पुणे यांनी अतिशय प्रभावी समालोचन केले. शर्यतीमध्ये संपूर्ण राज्यातील नामवंत 200 बैलगाड्या स्पर्धकांनी भाग घेतला. अलोट गर्दी व उदंड प्रतिसादात रात्री 8 पर्यंत मैदान चालले. भव्य व्यासपीठ, प्रशस्त मैदान, प्रेक्षक गॅलरी, भव्य स्क्रीन, अद्यावत प्रकाश व ध्वनी यंत्रणा, रुग्ण वाहिका, महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. हजारो महिलांनीही बैल गाड्या शर्यतींचा थरार अनुभवला. नेताजीराव पाटील, शशिकांत पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, अतुल पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. बंडासो देशमुख, विकास लाहिगडे, मकरंद माने, विक्रम गावडे, संजय लाहीगडे, सोमनाथ लाहिगडे, अक्षय लाहिगडे, अभिषेक दंडवते, जितेंद्र पाटील, बजरंग माळी, शरद शिनगारे, अनिकेत कुंभार, कन्हैया बोडरे, पोपट माने, विकास पाटील, काका पाटील, विजय काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी अतिशय कष्ट घेतले.

 नेटके संयोजन, महिलांची लक्षणीय उपस्थिती

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यत झाल्या परंतु जयंत केसरी बैलगाडी शर्यतीला प्रथमच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नेटके संयोजन अतुलभाऊ लाहीगडे यांनी केल्याने बैलगाडी शर्यत अविस्मरणीय ठरली अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

फोटो ओळी- कासेगाव येथे जयंत केसरी’बैलगाडी शर्यती मधील वन बीएचके फ्लॅटच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी पै.सचिनशेठ वाई, उमेशशेठ हारफळे,अमितशेठ पाडळी, अधिक पैलवान कळंबी यांना फ्लॅटची चावी सुपूर्द करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील समवेत संयोजक अतुलभाऊ लाहिगडे, देवराज पाटील, खंडेराव जाधव व कार्यकर्ते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज