जुन्या भांडणाच्या वादातून घडली घडना
shirol murdar news : शिरोळमध्ये दगड आणि कोयत्याने तरुणाचा खून : शिरोळ येथे जुन्या भांडणाचा वाद मनात धरून सात तरुणांनी दगड आणि कोयत्याच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा खून झाला. दीपक दशरथ मगदूम (वय 20, रा. शिवाजीनगर, शिरोळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल रात्री उशिरा नदीवेस तीन तिकटी जवळ रस्त्यावर घडली.
दरम्यान या प्रकरणी परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा. शिरोळ) या सात जनाविरुद्ध शिरोळ पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे आणि दीपक मगदूम यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते.
या जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख याने दीपक मगदूम यास सोमवार दि. 8 जून रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला जायचं आहे. असे सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ आणले. यावेळी शेख याने हातात दगड घेऊन मारा रे याला म्हणून मगदूम याच्या डोक्यात पाठीमागून मारले.
यावेळी अमोल सावंत याने शेख यास बाजूला केले असता शेख याने अमोल सावंत यांची गळपट धरून हाताने मारहाण करत तुला पण मारीन अशी धमकी दिली. त्या ठिकाणी अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील प्रतीक सावंत, विनायक साळुंखे हे त्या ठिकाणी आले. यावेळी प्रज्योत साळोखे यांने अमोल सावंत याचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असे म्हणत त्याला बाजूला ओढू लागला.
यावेळी संशयतांनी मिळून दीपक मगदूम यास ओढून घेऊन शेतात नेऊन त्याला दगडाने मारहाण केली. यास दरम्यान रोहन कांबळे यांनी कोयत्याने दीपक मगदूम यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली. यावेळी सर्वजण त्या ठिकाणाहून जात असताना रोहन कांबळे याने आपल्याजवळील कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही, तुला नंतर बघून घेतो, अशी धमकी दिली.
shirol-murdar-news-young-man-murdered-with-stones-and-a-sickle-in-shirol
त्यानंतर सर्व संशयित आरोपीनी घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान या घटनेची रात्री पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी जखमी दीपक मगदूम यास तात्काळ मिरज येथील येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. सोमवार सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनीही घटनास्थळी भेट दिली. उपचारादरम्यान सोमवार दीपक मगदूम याचा मृत्यू झाला.
शिरोळ पोलीस ठाण्यात परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे , या सात जणांनी संगणमताने दीपक मगदूम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर या करित आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











