pune murdar news : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड

SHARE:

pune murdar news : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड : पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर भरदुपारी झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण हल्ल्याचा कट रचणार्‍या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली असून, थेट हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी 3 आरोपींना पुणे गुन्हे शाखेने दौंडमधून बेड्या ठोकल्या आहेत.

pune murdar news : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड

पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक

ज्यांनी या रक्तरंजित हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होता, त्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण यांना पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 प्रत्यक्ष हल्लेखोरांना पुणे क्राईम ब्रँचने दौंड परिसरात सापळा रचून अटक केली आहे.

दौंडवरून सोलापूरच्या दिशेने पळताना अटक

शिवाजीनगर कोर्ट परिसरात फायरिंग आणि कोयत्याने वार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. हे आरोपी आधी दौंडच्या दिशेने आणि त्यानंतर सोलापूरच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक तपास सुरू केला.

आरोपी ज्या मार्गाने पुढे गेले, त्या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देत माहिती पोहोचवण्यात आली. तसेच त्या मार्गावरील सर्व चेक पॉईंट्सवर पुणे पोलिसांची क्राईम ब्रँच तैनात करण्यात आली होती. नाकाबंदी आणि क्राईम ब्रँचच्या पथकाने केलेल्या कारवाईत 3 हल्लेखोर दौंडमधून ताब्यात घेण्यात आले असून, आता त्यांना पुढील सखोल चौकशीसाठी पुण्यात आणले जात आहे.

बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळ हा थरार घडला. कात्रज भागातील रहिवासी असलेला मंदार किवळे हा कोर्टातील सुनावणी आटोपून गेट नंबर 4 बाहेर आला असता, दोन दुचाकीवरून आलेल्या 6 हल्लेखोरांनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप जीवघेणे वार केले.
भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय

या हल्ल्यामागे गुन्हेगारीची जुनी पार्श्वभूमी आणि वैमनस्य असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी मंदार किवळे हा 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून, नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. आज या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो कोर्टात आला असता, शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा