kolhapur crime news : मोटारीची वायर तोंडाने सोलली, आयुष्याची दोर तुटली; विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, रेंदाळ येथील दुर्दैवी घटना

SHARE:

kolhapur crime news : मोटारीची वायर तोंडाने सोलली, आयुष्याची दोर तुटली; विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, रेंदाळ येथील दुर्दैवी घटना : रेंदाळ (ता. हातकणंगले), येथे घराच्या अंगणात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी वायरची पिन जोडताना विजेचा जोरदार धक्का बसून सुबहान यासीन नाईकवाडे (वय 17, रा. मुजावर गल्ली, रेंदाळ) या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. 22) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने नाईकवाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

kolhapur crime news : मोटारीची वायर तोंडाने सोलली, आयुष्याची दोर तुटली; विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, रेंदाळ येथील दुर्दैवी घटना

सकाळी नऊच्या सुमारास नळाला पाणी आल्याने सुबहानने मोटार सुरू केली होती. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाला. कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍याने पाणीपुरवठा बंद केला; परंतु मोटारीचा स्विच बंद करायचे राहिल्याने विद्युत प्रवाह सुरूच राहिला. दुपारी अडीचच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा पाणी आल्याने सुबहान मोटारीची वायर हाताळत पिन जोडण्यासाठी गेला. वायरचे आवरण तोंडाने काढत असताना त्याला जोराचा विजेचा धक्का बसला.

त्याने आरडाओरड केली; मात्र पाणी भरण्याच्या गडबडीत सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही. हा प्रकार शेजार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काठीच्या साहाय्याने त्याला बाजूला सारून तातडीने वीजपुरवठा बंद केला. गंभीर अवस्थेत त्याला खासगी दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील आणि छोटी बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.

पाण्यासाठी जीव धोक्यात!

गावात कधी आठ दिवसांनी तर कधी पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यातही अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना नाइलाजाने मोटारी लावाव्या लागतात. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा