rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्न नाही, तुम्ही कामाला लागा

जनप्रवास । सांगलीSANGLI LOKSABHA : सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्न नाही, तुम्ही कामाला लागा : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, पक्षाने गेल्या वर्षभरापासून जोरदार ताकदीने प्रचार सुरू केला आहे, गेल्यावर्षीसारखी जागा सोडण्याची चूक यावर्षी नको, जागा काँग्रेसलाच हवी अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमोर केली. सांगलीची जागा सोडण्यासंदर्भात कसलीही चर्चा नाही. तुम्ही कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्न नाही, तुम्ही कामाला लागा

काँग्रेस नेत्यांचा विश्वास, जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 19 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई टिळक भवनमध्ये बैठक घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते. सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात जिल्ह्यातील नेते आ. विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी बाजू मांडली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेला सोडण्याचा विषय आता थांबवा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.

2019 च्या निवडणुकीत जागा सोडण्याची चूक काँग्रेसने केली.

सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत जागा सोडण्याची चूक काँग्रेसने केली. या निवडणुकीत देखील कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा आता बंद करावी. यावेळी निर्धाराने लढून जिंकणार आहोत. त्यामुळे आम्हाला कामाला लागू द्या, अशी मागणी अनेक मान्यवरांनी केली. आ. विश्वजीत कदम यांनी तर काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच बोल सुनावणे. ते म्हणाले, माझ्या नेतृत्वात ही निवडणूक होत असताना आपला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. मला पक्षश्रेष्ठींनी ही निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, मात्र मी विशाल यांना शब्द दिला आहे. त्यांना उमेदवारी देवू, आम्ही त्यांना एकजुटीने निवडून आणू. गेल्यावर्षीची पुन्हा चूक यावेळी नको.

आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, जिल्ह्यात वातावरण खूप चांगले आहे. काँग्रेसला विजयाच्या पूर्ण संधी आहेत. यावेळी वेगळा विचार करू नका. हा पुन्हा बालेकिल्ला बनवून दाखवू. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकमुखाने विशाल पाटील यांचे नाव दिले आहे. त्यांची उमेदवारी लवकर जाहीर करावी.

विशाल पाटील म्हणाले, भाजपसमोर आम्ही एकसंघपणे आव्हान उभे केले आहे.

वातावरण चांगले आहे. मतदार संघात मी फिरलोय. बूथ लेव्हलला काम झाले आहे. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात आमची मजबूत एकजूट झाली आहे. ते आमचे नेते आहेत. तुम्ही उमदवार ठरवा. मी पक्षाशी बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ही जागा शिवसेनेला सोडली तर मी लढणार नसल्याची भूमीका त्यांनी मांडली. तर सांगली लोकसभा जागा ही काँग्रेसचीच आहे, काँग्रेसच लढणार, कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा सोडावी लागणार या सर्व वावड्या आहेत, तिकडे लक्ष देऊ नका, कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या.

अन् विशाल पाटलांचा क्षणातच होकार….

विशाल पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे सांगितले, तोच धागा पकडून डॉ. कदम म्हणाले, ही जागा विशाल पाटील लढवतील व आम्ही त्यांना सर्व ताकदीने, एकजुटीने निवडून आणू मात्र विशाल पाटील यांनीही हीच पध्दत कायम ठेऊन यापुढे लोकसभा निवडणुकीत मदत करणार्‍यांना ताकद द्यावी.

आमदार विश्वजीत कदम यांनी सर्व नेत्यांसमोर विशाल पाटील यांच्याकडून ‘एकजूट कायमची असेल’, असा शब्द घेतला. आपली निवडणूक झाली की इतरांना सोडू नका. सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवा. जुने अनुभव चांगले नाहीत, ते पुन्हा येता कामा नयेत, अशी ग्वाही सर्वांसमोर द्या, अशी मागणी केली. विशाल यांनी ही ‘परमनंट एकी’ आहे, असे सांगत त्यांना प्रतिसाद दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज