rajkiyalive

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ मतदारसंघ कायमच राजू शेट्टींच्या पाठिशी

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ मतदारसंघ कायमच राजू शेट्टींच्या पाठिशी : 2004 मध्ये शिरोळ विधानसभा मतदार संघातून आमदार झालेल्या राजू शेट्टींनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला. त्या त्यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य होते. शरद जोशींचा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मोहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लागली आणि आमदार असणार्‍या राजू शेट्टींनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत जाणे आवश्यक आहे असे समजून लोकसभेच्या रणांगणात उतरले.

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ मतदारसंघ कायमच राजू शेट्टींच्या पाठिशी

2009, 2014 आणि 2019 अशा तीन लोकसभा निवडणुका त्यांनी लढवल्या. या तिन्ही निवडणुकीत शिरोळ तालुक्यातील जनतेने कायमच त्यांना डोक्यावर घेतले. तिन्ही निवडणुकीत राजू शेट्टींच्या पदरात मताबरोबर पैशाचेही दान टाकले.

2009 च्या निवडणुकीत मतदार संघाची पुनर्रचना झाली.

पूर्वीचा इचलकरंजी मतदार संघ नव्याने हातकणंगले मतदार संघ झाला. या मतदार संघात सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदार संघ जोडले गेले. काँग्रेस आणि राष्टॅवादी काँग्रेसची आघाडी होती. या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाटणीला गेली आणि तत्कालिन खासदार निवेदिता माने यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली.
दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी रान पेटवायला सुरूवात केली होती. हा हा म्हणता संपूर्ण मतदार संघात शेट्टींच हवा झाली. सर्वच शेतकर्‍यांनी जात, पात, पक्ष विसरून शेट्टींच्या मागे उभे राहिले. शिरोळ विधानसभा मतदार संघात त्यांना 83258 मते मिळाली तर निवेदिता माने यांना 78367 मते मिळाली. सुमारे 5 हजार मताचे मताधिक्य राजू शेट्टींना मिळाले. लोकसभेच्या मैदानात राजू शेट्टींनी पहिल्यांदाच बाजी मारली.

पाच वर्षात संसदेत काम केल्यानंतर राजू शेट्टींना राजकारणाची हवा कळाली.

येणारा काळा मोदींचा असणारा हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी भाजपशी सलगी केली. राजू शेटटींचा वारू कोण रोखणार हा प्रश्न काँगेे्रस राष्ट्रवादीपुढे होता. उमेदवारी घ्यायला कोणीच तयार होईना. माजी खासदार असलेल्या इचलकरंजीच्या कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

भाजपने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले होती.

संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. त्याचा फायदा राजू शेट्टींनाही झाला. शिरोळ विधानसभा मतदार संघात 1 लाख 11 हजार 126 मते तर विरोधी कल्लापाण्णा आवाडे यांना 87 हजार 573 मते मिळाली. 23 हजार 583 मताचे लीड या निवडणुकीत शिरोळकरांनी राजू शेट्टींना मिळाले. भरघोस मतांनी राजू शेट्टीं दुसर्‍यांदा निवडून आले.

दरम्यानच्या काळात राज्यात भाजप सेनेची सत्ता आली.

सत्तेत सहभागी असणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत संधी मिळाली. सदाभाउ खोत यांना विधान परिषद आणि राज्यमंत्रीपदही मिळाले. दुसरे कार्यकर्ते रविकांत तुपकर यांनाही महामंडळ मिळाले. सत्तेत सहभागी झाल्यामुळे मात्र संघटनेला घरघर लागली. पदे मिळालेलेे सर्वच कार्यकर्ते संघटना सोडून गेले. राजू शेट्टींनीही भाजपवर आरोप करायला सुरूवात केली. याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीने घेतला.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या कळपात राजू शेटटी दाखल झाले.

त्यांच्या विरोधात त्यांचे चेले असणारे सदाभाउ खोत सभांचे मैदान गाजवत होते. राजू शेट्टींच्या विरोधात भाजप शिवसेना युतीने धैर्यशील माने यांना मैदानात उतरवले. संपूर्ण मतदार संघात जातीयवादाचे बिज पेरले गेले. राजू शेटटींबदलही नाराजी होती. परंतु शिरोळ तालुक्याने मात्र शेट्टींना हात दिला. त्यांना 99 हजार 977 तर धैर्यशील मानेंना 92 हजार 929 मते मिळाली. सुमारे सात हजाराचे मताधिक्य राजू शेट्टींना शिरोळ मतदार संघातून मिळाले.

तिन्ही निवडणुकीत शिरोळ मतदार संघात घरचा उमेदवार म्हणून शिरोळ मतदार संघाने शेट्टींना डोक्यावर घेतले. यंदाही राजू शेट्टी मैदानात आहेत. यंदा मात्र ते एकला चलोरेच्या भुमिकेत आहेत. यंदाही शिरोळ त्यांच्या मागे उभी राहते की काय हे 4 जूनला कळेल.

पाच हजारापासून 23 हजारापर्यंत मताधिक्य

2009 च्या निवडणुकीत राजू शेट्टींना सुमारे 5 हजार, 2014 च्या निवडणुकीत 23 हजार आणि 2014 च्या निवडणुकी 7 हजाराचे मताधिक्य शिरोळ विधानसभा मतदार संघातून मिळाले. यंदाची ही राजू शेट्टींची चौथी निवडणूक आहे. यावेळीही शेट्टी बाजी मारतात की काय हे 4 जूनला कळेल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज