rajkiyalive

VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले

जनप्रवास । सांगली
VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. याचा अहवाल तयार करून दिल्लीला पाठविला जाणार आहे. तेथून जे आदेश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी होतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले

चंद्रहार पाटलांच्या प्रचारात काँग्रेस सहभागी होणार

काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आजा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना समजूत घेतल्या. विशाल पाटील यांच्यावर कारवाईचा निर्णय दिल्लीतून होते. सांगलीचा सर्व अहवाल दिल्लीला पाठवला जाणार आहे. त्यातून जो आदेश येईल, त्यानुसार काम केले जाईल. सध्या देशाची परिस्थिती भयावह आहे. सत्तेचा दुरूपयोग भाजपने केला आहे, त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते कामाला लागतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले

देशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे.

ते म्हणाले, देशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे. गांधी कुटुंबियांना ईडी मार्फत त्रास देण्याचे काम भाजपने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप येता कामा नये, यासाठी काम करण्याचे आदेश दिले. सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ताकदीने काम करेल. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे.

भाजप वारंवार चारशे पार जागांची घोषणा होतेय, ती ही निवडणूक शेवटची होऊ शकते.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नेहमी स्वातंत्र्यपासून देशाचा विचार करणारी आहे, त्यामुळे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्ते महविकास आघाडीच्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजीत कदम, आ.विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

जागा वाटप जाहीर विषय संपला…

एकदा जागावाटप झाल्यानंतर हे सगळे विसरावे लागते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही हतबल नाही. देशाचे स्वातंत्र्य आणि देशाचे संविधान निर्मितीत काँग्रेसचे योगदान आहे, त्यामुळे ते वाचवणे काँग्रेसची जबाबदारी आहे. लोभापेक्षा देश महत्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेसचाच कार्यकर्ता निवडणुकीत पुढे असेल, असे मत नाना पटोेले यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज