rajkiyalive

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात

जनप्रवास । प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात : सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (दि. 27) जिल्ह्यात येत आहेत. कडेगाव येथे त्यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा होईल. गेल्या काही दिवसांपासून माजी आ. देशमुख नाराज असमल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजयकाका पाटील यांच्यासह माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यामुळे देशमुख यांची मनधरणी केली जाईल, त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात

नाराज पृथ्वीराज देशमुखांची होणार मनधरणी

मागील आठवड्यात भाजपचे संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होताच प्रचाराला गतीने सुरुवात झाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामसिंह देशमुख हे संजयकाका पाटील याचा प्रचार करीत आहेत. मात्र माजी जिल्हाध्यक्ष देशमुख हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः पुन्हा कडेगावमध्ये येणार असून त्यांची समजूत काढणार असल्याबाबतचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात बारमाही पाणी मिळाले पाहिजे.

तेथील शेती बागायती झाली पाहिजे, शेतकर्‍यांना समृद्धी आली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजनांसाठी खासदार पाटील यांनी निधी आणून योजनांना गती दिली. त्यामुळे दुष्काळग्रस्त कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, तासगाव, मिरज पूर्व भाग येथे पाणी पोहोचले. त्यासाठी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मदत केली.

शुक्रवारी कडेगाव येथे होणार्‍या या सभेला फार मोठे महत्त्व आहे.

माजी आमदार संपतराव देशमुख यांनी टेंभू योजनेच्या मंजुरीसह दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सातत्याने पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्याच विचारांचा आणि कार्याचा वारसा घेऊन पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे काम करत आहेत. संजयकाका पाटील यांनी पाणी प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये त्यांचाही सहभाग असतो, त्यामुळे शुक्रवारी कडेगाव येथे होणार्‍या या सभेला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच या सभेबद्दल उत्सुकता लागली आहे.

राजकारणाचा धंदा करणार्‍यांना कोण भुलणार नाही
खा. संजयकाका पाटील, मिरजेतील नगरसेवक सोबत असल्याचा दावा

जनतेचा विकास हाच भाजपचा अजेंडा असून राजकारणाचा धंदा करणार्‍यांना कोणीही भुलणार नसल्याचे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. मिरजेतील नगरसेवक आणि जनता आमच्याबरोबर असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केले.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी मिरज शहरात गुरुवारी दिवसभर दौरा केला. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, संजय चौगुले, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, मिरजेतील काही लोकांनी राजकारणाचा धंदा मांडला आहे. अशा बाजार बुणग्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल. पक्षाने ज्यांना दोन वेळा स्थायी समितीचे सभापती पद दिल. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. ते ज्या जातीत जन्मले त्या जातीच्या तत्त्वांनाही त्यांनी तिलांजली दिली आहे. अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांकडे आपण लक्ष द्यावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. त्याचा विचार करून लोकसभा निवडणुकीत मिरजकरांनी भाजपाला मताधिक्य द्यावे. असे आवाहन खासदार पाटील यांनी केले.

दरम्यान विविध ठिकाणी भेटीगाठी आणि बैठका घेतल्या. शेतकरी चौक, मिरज प्रभाग क्र. 7 येथून प्रचार शुभारंभ करण्यात आला. ब्राम्हणपूरी, पटवर्धन वाडा, बसवेश्वर चौक, बुधवार पेठ, मेंढे मळा, भानू तालीम जवळ, कबाडे वाडा, धनगर गल्ली, डोणगे गल्ली, समतानगर, पंढरपूर रोड, रेणुका मंदिर भेट, शास्त्री चौक असा प्रचार दौरा करण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज