rajkiyalive

जतमध्ये विलासराव जगताप, काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे अपक्षाला बळ

जनप्रवास । सांगली

जतमध्ये विलासराव जगताप, काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे अपक्षाला बळ : सांगली लोकसभेच्या 2014, 2019 च्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मताधिक्य जत विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते. मात्र यावेळी माजी आमदार विलासराव जगपात व त्यांच्या समर्थकांनी भाजप सोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना साथ दिली आहे. शिवाय काँग्रेस कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ उतरले आहेत. त्यामुळे विशाल पाटलांना या मतदारसंघात बळ मिळाले आहे. मात्र खासदार संजयकाका पाटील यांनी नव्याना मांडणी करत भाजपच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांसह अनेकांवर गळ टाकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ‘जत’ संवेदनशील होत आहे.

जतमध्ये विलासराव जगताप, काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे अपक्षाला बळ

खासदारांची नव्याने मांडणी

सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. 2019 च्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना तब्बल 45 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत हे मताधिक्य कमी झाले. खासदारांना केवळ 24 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत भाजपचा कस लागणार आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पक्षाने उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे केली होती. मात्र पक्षाने पुन्हा खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत.

 दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी आ. विक्रम सावंत सध्या तटस्थ दिसत आहेत.

काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी आ. विक्रम सावंत यांनी प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात उघड फिरत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील यांना माजी आमदार विलासराव जगापत यांच्यासह काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांच्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे.

संजयकाका पाटील यांनी नव्याने जत विधानसभा मतदारसंघात समीकरणे रचली आहेत.

दुसरीकडे विलासराव जगताप यांनी भाजपची साथ सोडल्याने खासदार संजयकाका पाटील यांनी नव्याने जत विधानसभा मतदारसंघात समीकरणे रचली आहेत. दुसर्‍या टप्प्यातील भाजप कार्यकर्ते प्रचाराला लावले आहेत. तर काँग्रेसचे आ. विक्रम सावंत यांचे समर्थक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे स्वीकृत संचालक सरदार पाटील भाजपच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. यासह अनेक नव्याने फासे खासदार संजयकाका पाटील टाकत आहेत.

त्यामुळे भाजपला या मतदासंघात मताधिक्य राखण्याचे आव्हान असणार आहे.

जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाची ताकद मर्यादीत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद या मतदारसंघात मर्यादीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत 2019 मते पडलेली मते

* संजयकाका पाटील (भाजप): 78,050
* गोपीचंद पडळकर (वंचित आ.): 53,083
* विशाल पाटील (स्वाभिमानी): 31,768

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज