SANGLI : तुमच्या घरात 12 वेळा खासदारकी, पण माझ्या 5 टक्के तरी निधी आणला का?

SHARE:

खासदार संजयकाका पाटील यांचे विशाल पाटलांवर टीकास्त्र

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : तुमच्या घरात 12 वेळा खासदारकी, पण माझ्या 5 टक्के तरी निधी आणला का? : सांगली ः तुमच्या घरात बारा वेळा खासदारकी होती, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान मिळाले. माझ्या पाच टक्के तरी निधी तुम्ही आणला का? असा सवाल करीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडा, अन्यथा मी मांडता, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सहानुभुतीच्या लाटेवर राजकारण टिकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

SANGLI : तुमच्या घरात 12 वेळा खासदारकी, पण माझ्या 5 टक्के तरी निधी आणला का?

सांगलीत निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीनंतर खा. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, दिपक शिंदे-म्हैसाळकर, नीता केळकर उपस्थित होत्या.

अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

खा. पाटील म्हणाले, विशाल पाटील यांच्या घरात 35 वर्षे खासदारकी, 15 वर्षे आमदारकी ते आमच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी 35 वर्षाचा हिशोब द्यावा. ते माझ्या कामाचा हिशोब मागत आहेत, त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यावा. जिल्ह्यात शून्य टक्के वेगाने सिंचन योजना जात होत्या, त्यांना आम्ही गती दिली. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगावसारख्या तालुक्यात दुष्काळ प्रचंड होता, त्याला जबाबदार कोण?, त्याचे उत्तर न देता ते आजोबांची अस्मिता दाखवत आहेत. जनतेच्या अस्मितेसाठी त्यांनी काय केलं? ते सांगावे.

प्रतीक पाटील यांना घरातूनच त्रास असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला.

विरोधक म्हणून देखील त्यांनी कोणतेही काम केले नाही. सोशल मीडियाचा वापरून, केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. निवडणूक टप्प्यात आली असल्याचे ते सांगत आहेत, मात्र 7 तारखेला तुम्हाला दिसेल की मी अडीच लाख मतांनी विजयी होईन, असा विश्वास खा. पाटील यांनी व्यक्त केला.

कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेरीनाला प्रश्न निर्माण झाला आहे.

अख्या सांगलीला दूषित पाणी वर्षांनुवर्षे संगलीकरांना प्यावे लागत आहे. भारत सूतगिरणी बंद पाडली, प्रकाश ऍग्रो, वसंतदादा मका प्रकल्प, साबुदाणा प्रकल्प, वसंतदाद कृषी संशोधन केंद्र, सोनी कारखाना, जिल्हा दूध संघ, शासकीय अनुदान लाटले ते काय केले. वसंतदादानी उभा केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या हे लोकांना समजते. लाट निर्माण करुन त्यावर स्वार होऊन, पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. केवळ लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्याची टीका खा. पाटील यांनी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *