rajkiyalive

सांगलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक : बेंद्री येथील वृद्ध ठार.

सांगलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक : बेंद्री येथील वृद्ध ठार. : सांगली : शहरातील बायपास मार्गावर असणार्‍या शिवशंभो चौक येथे भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तासगाव तालुक्यातील बेंद्री येथे राहणारे आनंदराव हरी भोसले (वय 65) हे जागीच ठार झाले. सदरचा अपघात हा शुक्रवार दि. 03 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी विकास आनंदराव भोसले (वय 41 रा. बेंद्री) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयीत टेम्पो चालक वैभव सुभाष कोठावळे (वय 35 रा. अब्दुललाट जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सांगलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक : बेंद्री येथील वृद्ध ठार.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत आनंदराव भोसले हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील बेंद्री गावामध्ये राहत होते. आनंदराव हे शुक्रवारी दि. 03 मे रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विकास यांची मोटारसायकल (क्र, एमएच 10 डीसी 9819) वरून निघाले होते.

त्यांची दुचाकी बायपास मार्गावरील शिवशंभो चौक येथे आली असता संशयित चालक वैभव कोठावळे याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. एमएच 09 एफएल 6072) हा भरधाव वेगात चालवून पाठीमागून भोसले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. घडलेल्या घटनेनंतर मृत आनंदराव भोसले यांचा मुलगा विकास भोसले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कोठावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या अपघातात दुचाकीचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

——————————

उद्धव ठाकरेंच्या सभेत बेकायदेशीर ड्रोन कॅमेरा उडवला : तरुणाला दिली नोटीस.

सांगली : शहरातील नेमिनाथनगर येथे गुरुवार दि. 02 मे रोजी महाविकास आघाडीची सभा आयोजित केली होती. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या सभेवेळी बेकायदेशीर कोणतीही पूर्व परवानगी न घेता हवेत ड्रोन कॅमेरा उडवून चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सदरचा प्रकार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला नोटीस दिली आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल सुहेल मुल्ला यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज