rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपुरात राजकीय तडजोड करणार्‍यांनी निष्ठा शिकवु नये

भाजपा पदाधिकार्‍यांचा पलटवार ः निवडणुका म्हणजे यांची सुगी

 

इस्लामपूर ः प्रतिनिधी

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपुरात राजकीय तडजोड करणार्‍यांनी निष्ठा शिकवु नये राजकीय पक्षाचे बॅनर वापरुन तोडपाणी व्यवसाय करणार्‍यांनी व निवडणुकांकडे सुगी म्हणुन पाहणार्‍यांनी पक्षीय निष्ठेवर बोलणे व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यावर बोलणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असा पलटवार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकार्‍यांनी राहुल महाडीक, विक्रम पाटील व आनंदराव पवार यांच्यावर केला. तिघांमध्ये हिंमत होती तर एकदा तरी विधानसभा निवडणूक लढविण्याचे धाडस का दाखवले नाही असा सवाल केला. बिनबुडाच्या आरोपामुळे संबधीतांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहे. गट म्हणुन काम करणार्‍यांनी स्वत:ची कर्तबगारी तपासावी नंतर निष्ठा शिकवावी, असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपुरात राजकीय तडजोड करणार्‍यांनी निष्ठा शिकवु नये

हातकणंगले लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारा विरोधात काम केल्याचा आरोपाला भाजपा पदाधिकार्‍यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील व शहराध्यक्ष अशोक खोत म्हणाले, निवडणुका आल्या की पक्ष व नंतर गट म्हणून काम करणार्‍यांनी त्यांचे विरोधक जयंत पाटील की निशिकांत पाटील हे एकदा जाहीर करावे व राजकीय वाटचालीस सुरुवात करावी. जयंत पाटील यांच्या विजयात या महारथीचा असलेला वाटा संपूर्ण इस्लामपूर विधानसभेतील स्वाभिमानी जनतेला माहीत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, शहराध्यक्ष अशोकराव खोत, धैर्यशील मोरे, अजित पाटील, अक्षय पाटील,
2019 विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राहुल महाडीक यांच्या लॉटरीचे तिकीट बक्षीस म्हणुन खुद्द जयंत पाटील यांनीच फाडले.

हा गद्दारीचा इतिहास कधीही पुसला जाणार नाही. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राहुल महाडीक यांच्या लॉटरीचे तिकीट बक्षीस म्हणुन खुद्द जयंत पाटील यांनीच फाडले. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ना.चंद्रकांत पाटील यांनी 4 तर माजी मंत्री रणजित पाटील यांनी तब्बल 27 बैठक घेतल्या. निशिकांत दादांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची लोकप्रियता व संघटन कौशल्य पाहून आम्हाला एखाद्या सभेला निमंत्रण न देण्याची काळजी घेतली.

वाळवा तालुक्याच्या बाहेरुन आलेल्यांनी आमचा डीएनए तपासण्याचा संबंधच काय?

गांधी चौकातील सभेत निशिकांतदादांना भाषण होऊ नये याची काळजी घेता एवढा व्देष कशासाठी? असा सवाल करत उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करण्यास सांगितले. कोल्हापूर येथील सभेसाठी भाजपाचे तालुकाध्यक्षांनी शिवसेना तालुकाध्यक्षांना फोन केला. मोदींची सभा आहे आम्ही येणार नाही असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले. इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरणासाठी आयोजित बैठकीला तत्कालीन नगरसेवक विक्रम पाटील व अमित ओसवाल यांनी गैरहजरी लावली, हीच तुमची पक्षनिष्ठा म्हणायची. असा सवालही केला. अजित पाटील म्हणाले, वाळवा तालुक्याच्या बाहेरुन आलेल्यांनी आमचा डीएनए तपासण्याचा संबंधच काय? स्व.नानासाहेबांनी निशिकांतदादांना जॅकेट घालायला सांगितले आहे. अक्षय पाटील म्हणाले, ज्यांना एक नागरी पतसंस्था चालवता आली नाही त्यांनी निशिकांत दादांवर टिका करु नये. आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुरेखाताई जगताप, उपाध्यक्ष भास्कर मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण माने, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, संदीप सावंत, यदुराज थोरात, प्रविण परीट, अजित पाटील, अक्षय पाटील, विश्वजीत पाटील, संदीपराज पवार, अक्षय कोळेकर, सयाजीराव जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पत्रकबाजी आणि चिरीमिरी…?

निवडणुकीपुरता पक्षाचा बॅनर वापरणारे राहुल महाडिक व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे यांनी पक्षाच्या लेटर पॅडवर निधी मंजूर झालेल्या विविध विकासकामांसाठी कोणीही टेंडर भरू नये असा मजकूर प्रसिद्ध करून अनेक ठेकेदारांना जणू त्यांनी दमच भरला होता. ही संस्कृती दोन्ही पक्षाची नाही, यामुळे भाजपा व शिवसेना पक्षाच्या विचारधारेला डाग लावण्याचे काम या मंडळींनी केले आहे. या पत्रकबाजीच्या चिरीमिरीतुन काय साध्य केले हे जाहीर करावे असे आवाहन अजित पाटील यांनी केले.

खा.माने यांची कर्तृत्वाच्या पुस्तकांची 300 किलो रद्दी

लोकसभा निवडणुकीत खा.धैर्यशील माने यांनी विकास कामांबाबत माहिती पुस्तिका काढली होती. परंतु चिरीमिरीवर लक्ष ठेवून असणार्‍यांना पुस्तिका वाटायलाही कार्यकर्ते मिळाले नाहीत. शहरातील एका नेत्याने मतदानानंतर 300 किलो पुस्तकांची रद्दी घालुन निष्ठा दाखवुन दिली आहे. काहींनी रोजंदारी देतो म्हणुन गरजु रोजंदार यांच्याकडुन पुस्तिका वाटली मात्र त्यांना रोजंदारीही दिली नाही. रद्दीतून उदरनिर्वाह चालावणार्‍यांनी निष्ठा शिकवु नये. असा टोला अक्षय पाटील यांनी लगावला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज