सांगली :
SANGLI : गर्भपात मृत्यूप्रकरणी सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावे निष्पन्न : कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपुरम येथे गर्भपात झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रसाठी मृतदेहासह संबंधित महिलेला कार मधून सांगलीत आणण्यात आले. दिवसभर मृतदेह घेऊन सांगलीत फिरल्यानंतर कुटुंबीय बस स्थानक परिसरात थांबले होते. या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच त्यांनी धाव घेतला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
SANGLI : गर्भपात मृत्यूप्रकरणी सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावे निष्पन्न
यानंतर पोलिसांनी आता नातेवाईकांसह सांगलीतील एका डॉक्टरासही ताब्यात घेतले असून त्यांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता जयसिंगपूर, कर्नाटकातील आणखी तीन डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा महालिंगपुरम ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले झालेले अर्भक चारचाकीत आढळून आले.
मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे. तिला दोन मुली आहेत. महिलेचे माहेर हे मिरज तालुक्यातील पश्चिम भागात आहे तर सासर हे हातकणंगले तालुक्यात आहे. सदरची महिला गरोदर असल्याने घरातील नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचे समजते. अहवाल मिळताच त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटक राज्यातील चिकोडी येथील महालिंगपुरम गाठले. तेथील एका रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
वैद्यकीय अधिकार्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.
त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यामध्ये अडचण येत होती. मृत महिलेस चारचाकीत घालून तिचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आज सायंकाळी सांगलीत आले होते. त्यांच्यासमवेत मिरज तालुक्यातीलच एक डॉक्टर ही होते. या प्रकारची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करुन गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले.
पोलिसाच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले.
एका चारचाकीमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेवून मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. नातेवाईकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की नाही याची शहनिशा करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली तेथील एक डॉक्टर आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन डॉक्टरांची नावे पुढे आली आहेत.
त्यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपूरम येथे रवाना झाले आहेत. सोबत मृत महिलेचा नातेवाईक, डॉक्टरासही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या गाडीची तपासणी पोलिसांनी केली असता यामध्ये त्यांना स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले आहे.
बोगस डॉक्टर समिती
गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोगस डॉक्टर समितीचा विषय चर्चेत आला आहे. समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले,‘‘सांगली काही डॉक्टरांचे रॅकेट आहे का, याचा तपास व्हायला हवा. तसेच समितीमध्ये पोलिस, महापालिकेचे अधिकारी असतात. गेल्या काही वर्षात समितीची बैठक झाली नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गांभिर्याने दखल घ्यायला हवी.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.