rajkiyalive

सांगली : गर्भपात विवाहिता मृत्यू प्रकरणी बोगस डॉक्टर अटकेत, जयसिंगपूरमधील तो डॉक्टर रडारवर

सांगली :

सांगली : गर्भपात विवाहिता मृत्यू प्रकरणी बोगस डॉक्टर अटकेत, जयसिंगपूरमधील तो डॉक्टर रडारवर : जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून महालिंगपूर (जि. बागलकोट) येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी बोगस महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. कविता बडनेवार असे संशयित महिलेचे नाव आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचे नाव या प्रकरणात उघड झाले आहे.

सांगली : गर्भपात विवाहिता मृत्यू प्रकरणी बोगस डॉक्टर अटकेत, जयसिंगपूरमधील तो डॉक्टर रडारवर

याबाबत अधिक माहिती अशी की, दुधगाव येथील माहेरवाशीन असलेल्या सोनाली सचिन कदम (वय 32 रा. आळते, ता. हातकणंगले) यांचा गर्भपातावेळी महालिंगपूर येथे मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शहरात फिरत असताना हा प्रकार सांगली पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली.

यानंतर मृत सोनाली यांचा भाऊ आणि त्याला मदत करणारा येथील एका बोगस डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जावून तेथील अधिकार्यांची भेट घेतली व गुन्हा वर्ग केला. यानंतर महालिंगपूर पोलिसांनी कविता बडनेवार या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तिने सोनाली यांचा गर्भपात केला होता. यावेळी प्रकृती गंभीर बनल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. महालिंगपूर पोलिसांनी कविता हिला अटक केली आहे तर या प्रकरणात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

जयसिंगपूरमधील तो डॉक्टर रडारवर

कर्नाटक राज्यात बागलकोट येथील महालिंगपूरम येथे गर्भपात करताना आळते (ता. हातकणंगले) येथील महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची गर्भलिंग चाचणी जयसिंगपूर येथे करण्यात आल्याची माहिती पुढे आल्याने जयसिंगपूर शहरातील गर्भलिंग चाचणी करणारा ‘तो’ डॉक्टर रडावर आला आहे. गेल्या किती दिवसापासून हा डॉक्टर अनधिकृतरित्या गर्भलिंग चाचणी करीत आहे हे तपासामध्ये स्पष्ट होणार आहे.

आळते (ता. हातकणंगले येथील सोनाली कदम या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित डॉक्टरने नकार दिल्याने कुटुंबिय मृतदेह घेवून कारमधून सांगलीत फिरत होते. यावेळी सांगली पोलिसांनी बसस्थानक परिसरात त्यांना ताब्यात घेतले. यानंतर गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात जयसिंगपूर-सांगली व कर्नाटक राज्यातील दोन डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधित महिलेची गर्भलिंग चाचणी जयसिंगपूर येथे करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. यामुळे आता जयसिंगपुरातील गर्भलिंग चाचणी करणारा ‘तो’ डॉक्टर रडावर आला आहे.

मिरज शहरानंतर जयसिंगपूर हे शहर आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते. जयसिंगपूर व शिरोळ येथे 14 मान्यताप्राप्त सोनाग्राफी केंद्रे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पुर्व भागासह कर्नाटक राज्यातील अनेक रुग्ण जयसिंगपूर शहरात विविध उपचारासाठी येतात. जयसिंगपूर शहरात यापुर्वीही गर्भलिंग चाचणीच्या घटना घडल्या आहेत. यानंतर 17 व्या गल्लीतील ‘त्या’ केंद्राला सिल करण्यात आले होते. याचबरोबर संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा आळते येथील महिलेची गर्भलिंग चाचणी जयसिंगपूरात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जयसिंगपूर शहरात गर्भलिंग निदान केले जात असल्याची चर्चा होती.

गुन्हा वर्ग, तपासाला गती

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील महिलेची गर्भलिंग चाचणी जयसिंगपूर येथे करण्यात आली तर कर्नाटक राज्यातील महालिंगपूरम येथे गर्भपात करण्यात आला. गर्भपातादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला. सांगली येथे मृत्यूप्रमाणपत्रासाठी कुटुंबिय मृतदेह घेवून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला. सांगली पोलिसांनी हा गुन्हा महालिंगपूरम पोलीसांकडे वर्ग केला आहे. यामुळे तपासाला गती आली आहे. गर्भलिंग चाचणी करताना जयसिंगपुरातील ‘त्या’ डॉक्टरने संबंधित कुटुंबास अहवाल दिला होता का? की गर्भलिंग चाचणी केल्यानंतर कोडवर्डमध्ये सांगितले हे तपासामध्ये स्पष्ट होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज