rajkiyalive

सांगलीच्या नूतन खासदारांनी दहा कामे केल्यास हत्तीवरून मिरवणूक; थार गाडी

जनप्रवास । सांगली

सांगलीच्या नूतन खासदारांनी दहा कामे केल्यास हत्तीवरून मिरवणूक; थार गाडी : लोकसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? यावर पैजा लागत असताना सांगली वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने नूतन खासदारांना दहा कामे पूर्ण करण्याचे आव्हान दिले आहे. ही दहा कामे पूर्ण केली तर नूतन खासदारांची हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना लोकवर्गणीतून थार गाडी देण्याचे देखील जाहीर केले आहे. याची चर्चा जोरदारपणे रंगली आहे.

सांगलीच्या नूतन खासदारांनी दहा कामे केल्यास हत्तीवरून मिरवणूक; थार गाडी

विकासासाठी ‘शिवकवच’चा अनोखा उपक्रम

सांगली लोकसभेची निवडणूक तिरंगी झाली. भाजपकडून खासदार संजयकाका पाटील, शिवसेना (उबाठा) गटाकडून चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या तिरंगी लढत झाली. निवडणूक दि. 7 मे ला पार पडली. तर दि. 4 जूनला मतमोजणी होणार असून सांगलीचा खासदार ठरणार आहे. मतमोजणीपूर्वी उमेदवारांच्या समर्थकांनी बुलेट, युनिकॉर्न गाडीसह इतर काही आर्थिक पैजा लावल्या आहेत. पण सांगली वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सांगलीच्या विकासाबाबतची पैज नूतन खासदारांबरोबर लावली आहे.

ही पैज जिंकली तर खासदारांची हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना नवीन कोरी महिंद्रा कंपनीची थार गाडी लोकवर्गणीतून देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मात्र यासाठी खासदारांना दहा कामे करावी लागणार आहेत.

यामध्ये माधवनगर रस्ता चिंतामणीनगर रेल्वे पूल बंद पडलेले काम चालू करून पूल दोन महिन्यात म्हणजे जुलै 2024 ला वाहतूकसाठी खुला करणे आवश्यक आहे. सांगलीसाठी नवीन पंढरपूर हायवे लगत एमआयडी सुरू करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातून मंजूर असलेले 3 राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करून नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून काम चालू होणे आवश्यक आहे. तसेच सांगली शहराला जोडणारे तालुक्यातून येणारे सर्व महत्वाचे रस्ते रूंदीकरण करणे आवश्यक आहेत. सांगली-इस्लामपुररोडवरील टोल नाका मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे आष्टा जवळ घ्यावे.

नवीन होणार्‍या राष्ट्रीय महामार्गाजवळ अ‍ॅग्रो क्लस्टर मंजूर करून नवीन उद्योग आणायला प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात ड्राय पोर्ट उभारणे व सांगलीसाठी नवीन विमानतळ मंजूर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील होतकरू खेळाडुंसाठी सर्व क्रीडांगणे अद्यावत करणे आवश्यक आहे. सांगलीमध्ये आयटी पार्क चालू करणे आवश्यक आहे. जेणेकरून पोटासाठी आई-वडिलांना सोडून मुले पुणे-मुंबईला जाणार नाहीत. तसेच सांगली शहराला थेट चांदोली धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी चांदोली धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणून काम सुरू करणे आवश्यक आहे. या कामांचे आव्हान नूतन खासदारांना देण्यात आले आहे.

सोशल मिडियावर पोस्ट जोरदार व्हायरल…

नूतन खासदारांनी दहा कामे केली तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना थार गाडी प्रदान करण्यात येणार आहे. तशी पोस्ट शिवकवच कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या याची चर्चा शहर व परिसरात सुरू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज