rajkiyalive

SANGLI LOKSABHA RESULT : मिरज पॅटर्नचा करिष्मा, 25 हजाराचे मताधिक्य

मिरज / उदय रावळ

SANGLI LOKSABHA RESULT : मिरज पॅटर्नचा करिष्मा, 25 हजाराचे मताधिक्य : अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी मिरजेतील मिरज पॅटर्न मोठ्या खंबीर पणे उभे राहिला. मिरज मतदार संघातून 25 हजारांचे मत्ताधिक्य मिळाले. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याबरोबर असणारे मिरजेचे नगरसेवक उघडपणे विशाल पाटील यांचा प्रचार करीत होते. मिरज पॅटर्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रीय झाल्येन; त्याचा करिष्मा लोकसभा निवडणुकीत दिसला.

SANGLI LOKSABHA RESULT : मिरज पॅटर्नचा करिष्मा, 25 हजाराचे मताधिक्य

सांगली लोकसभा निवडणुक ही ऐनकेन कारणाने चर्चेत राहिली. लोकसभा निवडणुकीत मावळते खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात एक प्रकारे विरोधाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भाजप अंतर्गत धुसफूस सुरू होती. उमेदवार बदलण्यापर्यंत घडामोडी घडल्या. परंतु शेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपतर्फे संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली.

महाविकास आघाडीतही काँग्रेसने सांगलीची जागा मागितली परंतु शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने ही जागा घेतली.अन नवीन उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास नाराजी नाट्य पसरले होते. काँग्रेसतर्फे विशाल पाटील इच्छूक होेते. परंतु तिकिट मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामध्ये मिरज पॅटर्नचा करिष्मा दिसला.

मिरज मतदार संघाकडे पाठ फिरविल्याने मतदार संघातून संजयकाकांना मोठा दणका बसला.

मिरत मतदार संघातून मोठी आघाडी मिळाली. मावळते खासदार संजयकाका पाटील यांनी अनेक मतदार संघाकडे फिरविलेली पाठ तसेच कार्यकर्त्यांमधील कमी झालेला संवाद आणि जिल्ह्यातील विकासात्माक कोणतेही कामे नसल्याने एक प्रकारे जनतेतूनच नाराजीचा सूर उमटविला होता. मिरज मतदार संघाकडे पाठ फिरविल्याने मतदार संघातून संजयकाकांना मोठा दणका बसला.

संजयकाकांनी काम न करता जनतेला गृहित धरल्यामुळेच त्यांचा मोठा पराभव झाला.

तसेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही सुसंवाद नव्हता. त्यामुळे काही भाजपमध्येही संजयकाकांच्या उमेदवारीबाबत नकारात्मकता होती. त्याचा फटकाही सुप्तपणे बसला आहे. मिरजेतील भाजपचे नगरसेवक एकत्र येवून मिरज पॅटर्नचा दणका दिला. एक प्रकारे मिरज पॅटर्नचा करिष्मा दिसला.

मिरज पटॅर्न विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबरपणे थांबले.

तर विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी दादा घराण्याला डावल्यानेचा प्रकार, तसेच विकासात्मक कोणतेही काम नाही, हाच मुद्दा पुढे घेवून जनतेच्या दरबारात गेले. प्रत्येक वाड्यावस्त्यांवर जावून प्रचारात आघाडी घेतली. तसेच मिरजेतील मिरज पटॅर्न विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबरपणे थांबले. तसेच मिरजेतील बाळासाहेब आंबेडकरांची सभाही विशाल पाटील यांच्या विजयासाठी पाठबळ ठरली. एक प्रकारे सर्व गोष्टी विशाल पाटील यांच्या बाजूने जुळून आल्या.
मिरजेतील नगरसेवकही संजयकाकांच्या उमेदवारीबाबत नाराजह ोते.

त्यामुळे मिरजेतील नगरसेवक हे अपक्ष उमेदवार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला. मिरज पॅटर्नचे आव्हान पालकमंत्र्यांच्या समोर उभे राहिले. मिरज पॅटर्नचे लोण मिरज शहरासह ग्रामीण भागातही दिसून आला.
लोकसभा निवडणुकीत मिरज मतदार संघात प्रथमता मिरज शहरातून मिरज पॅटर्न केलेला भाजपा विरोधात उठाव हा मिरज ग्रामीण भागातही याचे लोण आणि भाजप विरोधात झालेला उठाव हा पालकमंत्र्यांची डोकेदुखी ठरली.

मिरज पॅटर्न पूर्णताकदीनिशी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी मिरज पॅटर्नच्या बाजूने आजी, माजी नगरसेवक, आजी, माजी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्य सामील झाले होते. नूतन खासदार विशाल पाटील यांनी अस्तित्वाची केलेली निवडणूक बनविली होती. या लोकसभा निवडणुकीत मात्र मिरज पॅटर्नचा करिष्मा दिसला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज