rajkiyalive

SANGLI : जिल्ह्यात 3.75 लाख शेतकर्‍यांना मिळणार 125 कोटी

जनप्रवास । सांगली

SANGLI : जिल्ह्यात 3.75 लाख शेतकर्‍यांना मिळणार 125 कोटी : सांगली ः मान्सूनचे आगमन झाले असताना खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. ऐन हंगामात शेतकर्‍यांना पैशाची चणचण भासत असताना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता केंद्र सरकारने वर्ग केला आहे. जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार शेतकरी पात्र असून त्यांना दोन हजाराप्रमाणे तब्बल 125 कोटी मिळणार आहेत. जिल्ह्यात अद्याप 7 हजार शेतकर्‍यांची केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना शेतकरी सन्मानचा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

SANGLI : जिल्ह्यात 3.75 लाख शेतकर्‍यांना मिळणार 125 कोटी

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 2 हजाराचा हप्ता येणार, 7 हजार शेतकर्‍यांची केवायसी अपूर्ण

SANGLI : जिल्ह्यात 3.75 लाख शेतकर्‍यांना मिळणार 125 कोटी : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता व राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच मिळणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजार रुपयांसाठी शेतकर्‍यांना ई-केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही ’नमो महासन्मान’ योजना सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकर्‍यांना वर्षभरात एकत्रित 12 हजार रुपये मिळू लागले आहेत.

सांगली जिल्ह्यात पाच लाख 7/12 खातेधारक शेतकरी आहेत. त्याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. या योजनेचा लाभ खर्‍या आणि पात्र शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. 3 लाख 75 हजार शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण केली आहे. परंतु जिल्ह्यातील 7 हजारावर शेतकर्‍यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आगामी हप्ता मिळणार आहे.

कृषी विभागाकडून ई-केवायसी आणि आधार सीडिंग न केलेल्या शेतकयांची गावनिहाय यादी कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत संबंधितांना कळविण्यात आले. शिवाय, जनजागृतीही करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांनी अजूनही ई-केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाला असून खरीप पेरणीच्या मशागतींना वेग आला आहे. हंगामात बियाणे, खतांची गरज सून पंतप्रधान सन्मान योजनेच्या हप्त्यामधून काहीसा दिलासा मिळण्याच्या आशा आहेत.

नमो महासन्मानच्या चौथ्या हप्त्याचे काय?

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेतूनही वर्षाला 6 हजार मिळणार आहेत. जानेवारीत 2024 मध्ये गतवर्षीचे तीन हप्ते जमा करण्यात आले होते. चौथ्या हप्त्याबाबत अद्याप राज्य शासनाकडून घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना मिळणार काय? याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज