rajkiyalive

DAKSHIN BHARAT JAIN SABHA : दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील यांचे निधन

जनप्रवास । प्रतिनिधी

DAKSHIN BHARAT JAIN SABHA : दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील यांचे निधन : सांगली ः दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात योगदान देणारे रावसाहेब पाटील (वय 81) यांचे मंगळवार निधन झाले. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे, सामान्यांचे दादा म्हणून ख्याती असलेल्या पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांच्या आधारवडच कोसळला.त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये शोककळा पसरली आहे.

DAKSHIN BHARAT JAIN SABHA : दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील यांचे निधन

दरम्यान पाटील यांची गेल्या वीस दिवसापूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून ही सांगण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने मंगळवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, पुत्र अभिनंदन, उत्तम पाटील, मुलगी दिपाली, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी चार वाजता येथील अरिहंत शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शन झाल्यानंतर बोरगावच्या अरिहंत मराठी शाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोरगाव हेच कार्यक्षेत्र असलेल्या रावसाहेब पाटील यांचा जन्म 11 एप्रिल 1944 रोजी झाला. शेतकरी व खानदानी पाटील कुटुंबातून पुढे आलेल्या पाटील यांना घरातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वारसा घेतला. बोरगाव हा भाग मागासलेला आणि दुर्लक्षित होता. या भागाचे नंदनवन त्यांनी अथक प्रयत्न केले. अनेक संघर्षमय जीवनातून ते यशस्वी झाले.
दक्षिण भारत जैन सभेचे गेली चार टर्म (15 वर्षे) रावसाहेब पाटील अध्यक्ष आहेत. जैन सभेमध्ये ते सन 2002 पासून सक्रिय होते.

त्यांनी सन 2010 पासून अध्यक्षपदाचा धुरा सांभाळल्यानंतरच या सभेला खर्‍या अर्थाने नवी संजीवनी मिळाले. संस्कार, शिक्षण, आरोग्य या त्रिसूत्रीवर त्यांनी भर देत त्येक मुलाला उच्च शिक्षण मिळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना हाती घेतली. या माध्यमातून अनेकांना शिक्षण मिळाले आणि गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज