rajkiyalive

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही पलूसमधील अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात आढळून आलेला साप लाभार्थीने फेकून दिला होता. चौकशी अधिकार्‍यांना पोषण आहारात आढळलेला सापाचे पिलू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, तेथेही जावून पाहणी केली, परंतु मिळालेच नाही. याशिवाय संबंधित अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही साप पहायला मिळाला नसल्याचे चौकशी अधिकार्‍यांनी सांगितले.

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही

पलूसमध्ये एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत तीन वर्षापर्यंतचे बालक, गर्भवती मातांना दिलेल्या पोषण आहारात मृत साप सापडल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत बुधवारी प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महिला बालकल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आला. तालुक्यात पोषण आहार ठेवलेले गोदाम सील करण्यात आले असून अन्न औषध प्रशासनाने आहाराचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठविले.

शासनाकडून एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो.

गेल्या चार महिन्यापासून आहारात बदल करण्यात आला आहे. पलूस कृषीनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला होता. तो पॅकींग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला होता, या प्रकरणाची विधीमंडळाच्या अधिवेशनात पलूस-कडेगावचे आ. विश्वजीत कदम यांनी आवाज उठविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्यासह अन्न औषध प्रशासनाचे अधिकार्‍यांनी थेट पलूसमध्ये जावून चौकशी केली. संबंधित लाभार्थींकडून माहिती घेण्यात आली. घरात असलेल्या पोषण आहाराची पाहणी केली, त्यानंतर अन्न औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणीसाठी नमुने ताब्यात घेण्यात आले. ते नमुने शासकीय लॅबमध्ये पाठविण्यात आले. पोषण आहारात आढळलेला सापाचे पिलू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, ते मिळालेच नाही.

अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये शिल्लक असलेला पोषण आहाराचा साठा सील करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल महिला बालकल्याणचे आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. आहार नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईच्या सूचना…
पलूस येथील कृषीनगरच्या अंगणवाडी क्रमांक ११६ मधील शालेय पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडले असून यामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली, असून याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत. पलूस-कडेगावचे आ.डॉ.विश्वजीत कदम याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले आहे, यामुळे गरोदर माता तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. अश्या प्रकारामुळे आपण त्या मुलांच्या व मातांच्या आयुष्याशी खेळतोय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी पोषण आहाराच्या रुपात हरभरा, तांदूळ, तिखट, डाळी असा कच्चा माल दिला जात असे परंतु नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅट माल पुरविला जातो, सदर माल पुरवणाच्या राज्याचा ठेका एकाच कंपनीकडे आहे, त्यामुळे ते हा माल प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का? दोन महिन्याच्या माल एकाच दिवशी दिला जातो,
पण तो पॅट माल दोन महिने राहतो का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरलेच पण त्याची दाहकता देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी या संपूर्ण चैन मध्ये दोषी असणारे अधिकारी, कंपनी, ठेकेदार व अन्य कोणी यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

विधानसभा अध्यक्ष  राहूल नार्वेकर यांच्या कारवाईच्या सूचना…..

यासंबंधी आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी विधिमंडळात सविस्तर माहिती देऊन कारवाईची मागणी केली, यावर विधानसभा अध्यक्ष यांनी विधिमंडळाचे सदस्य विश्वजीत कदम यांनी सभागृहास दिलेली माहिती अतिशय गंभीर असून शासनाने त्याची दखल घेऊन उचित कारवाई करण्याची सूचना दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज