rajkiyalive

2 हजार 500 किलोमीटरचा विहार करत विशुध्दसागर मुनीसंघाचा रविवारी नांदणीत होणार प्रवेश

जयसिंगपूर  / प्रतिनिधी

2 हजार 500 किलोमीटरचा विहार करत विशुध्दसागर मुनीसंघाचा रविवारी नांदणीत होणार प्रवेश : प. पू. चर्याशिरोमणी श्री 108 आचार्य श्री विशुध्दसागर महाराज, ससंघ (26 पिंच्छी) सह पावन चातुर्मास (वर्षायोग) साठी नांदणी (ता. शिरोळ) येथे रविवार (दि. 14) रोजी सकाळी भव्य मंगल प्रवेश होणार आहे. दिल्लीतील बडोदा येथून सुमारे 2 हजार 500 कि.मी.चा विहार करत हा संघ येत्या रविवार दि. 14 जुलै रोजी नांदणी येथे दाखल होणार आहे.

2 हजार 500 किलोमीटरचा विहार करत विशुध्दसागर मुनीसंघाचा रविवारी नांदणीत होणार प्रवेश

यासाठी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ, बेळगाव यांच्याकडून सर्व नियोजन केले आहे. यासाठी श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केले.

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात आयोजित कार्यक्रमात महास्वामीजी म्हणाले, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थांन मठातंर्गत 743 गांवाचे अधिपत्य आहे. नांदणी येथे चातुर्माससाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात ससंघ युवक, युवती व समाजातील प्रत्येक नागरिकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे. येणार्‍या 4 महिन्यांत नांदणी येथे भारतातून भक्तगण येणार आहेत. त्यांची राहण्या-जेवणाची व्यवस्था केली आहे.

शनिवार (दि. 20) रोजी कलश स्थापनेसाठी हजारो श्रावक-श्राविक उपस्थित राहणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सांगली कर्मवीरचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक आप्पासाहेब भगाटे यांनी केले. यावेळी डॉ. अजित पाटील, राजेंद्र कुरडे, आण्णासाहेब शंभूशेटे, बबन टारे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. सागर शंभूशेटे यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज