rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : चैत्रबन नाला ओव्हरफ्लो: 20 घरांमध्ये शिरले पाणी; 50 घरांना वेढा

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI FLOOD NEWS : चैत्रबन नाला ओव्हरफ्लो: 20 घरांमध्ये शिरले पाणी; 50 घरांना वेढा : सह्याद्रीनगर परिसरात चैत्रबन नाला ओव्हरफ्लो झाल्याने गुरूवारी रात्री या परिसरातील वीस घरांमध्ये पाणी शिरले. तर सकाळी सुमारे 50 घरांना पाण्याने वेढा दिला होता. या ठिकाणी काही कामे अपूर्ण राहिल्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसला. मनपाची यंत्रणा तातडीने सतर्क झाली. त्यांनी रात्रीस कामाला सुरूवात करून शुक्रवारी सकाळपर्यंत पाण्याचा निचरा केला.

SANGLI FLOOD NEWS : चैत्रबन नाला ओव्हरफ्लो: 20 घरांमध्ये शिरले पाणी; 50 घरांना वेढा

सांगलीला गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. गुरूवारी रात्री नऊ वाजल्यापासून शहरात मुसळधार पाऊस पडला. पावसाने शहराला अक्षरश: धुऊन काढले. त्यामुळे शहरातील असलेला मुख्य चैत्रबन नाला ओव्हरफ्लो झाला. या परिसरातील लगतच्या नागरी वस्तीमध्ये नाल्यांचे व पावसाचे पाणी शिरले. पुण्यश्रीनगर, टी. के. पाटील हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी कॉलनी, नेहरूनगर परिसरातील सुमारे वीस घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले. तर पन्नास घरांना पाण्याने वेढा दिला. प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक नऊमधील अनेक कुटुंबांना या पाण्याचा फटका बसला. अनेक घरात, अंगणात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याने तळघरे भरून गेली. तळघरातील वाहने, साहित्याचेही प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली.

महापालिका प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने जेसीबीसह यंत्रणा या कामासाठी लावली.

विवेकानंद चौकात पोलीस लाईनच्या दिशेने नाला प्रवाहीत केला. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर नाल्याच्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र चैत्रबन नाल्याच्या मर्यादा पुन्हा उघड्या पडल्या. दहा कोटींचे आठ तुकडे न पाडता चैत्रबन नाला आयडियल नाला म्हणून विकसीत केला असता तर आजचे चित्र विदारक पहावयाच मिळाले नसते. नागरिकांच्या घरात व अंगणात पाणी शिरले नसते. चैत्रबन नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शासनाच्या फंडातून 85 लाख रूपये खर्चून सीडी वर्क आरसीसी कनर्व्हड करण्याचे काम बाकी असल्याने हा प्रकार झाला आहे.

त्यासाठी शासनाने तातडीने पैसे देणे आवश्यक आहे. दरम्यान, सह्याद्रीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने सीडी वर्कचे काम करण्यात आले होते. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सीडी वर्क बॉक्सचे काम पूर्ण करून नाला प्रवाहीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज