rajkiyalive

SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार

dineshkumar aitawade 9850652056

SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार : विसाव्या शतकातील प्रथमार्चाय आचार्य शांतीसागरजी महाराज यांची यंदाची 69 वी पुण्यतिथी मिरज तालुक्यातील समडोळी येथे साजरी करण्याचा निर्णय वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, दक्षिण भारत जैन समाज आणि सकल जैन सभा समडोळी यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसे पत्र सकल जैन समाजाला देण्यात आले. 5 सप्टेंबर रोजी ही पुण्यतिथी समडोळी येथे साजरी होणार आहे.

 

SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार

खंडीत झालेली मुनी परंपरा सुरू करणार्‍या आचार्य शांतीसागर महाराज यांना समडोळीत 1924 रोजी आचार्य ही पदवी देण्यात आली. त्या घटनेलाही यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र आचार्य शताब्दी समारोह अंतर्गत समडोळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या समडोळी येथे आचार्य शांतीसागर महाराज यांचे सप्तम पट्टाधीश आचार्य अनेकांतसागर महाराज आणि आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण धर्मसागर महाराज आणि निर्यापक श्र्रमण विद्यासागर महाराज यांचे चातुर्मास समडोळी येथे सुरू आहे. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने समडोळीतच आचार्य शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी साजरी व्हावी अशी समस्थ सकला जैन समाजाची इच्छा होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि. पाटील , केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, वीर सेवा दलाचे शशिकांत राजोबा, प्रकाश सांगावे, अजित भंडे, एन. जे. पाटील, अरविंद मजलेकर, सागर चौगुले, अनिल हवाणे यांच्या उपस्थित समडोळी येथील कल्पद्रुम हॉल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी संपूर्ण मुनी संघ, तिन्ही मंदिर कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, दोन्ही चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पधाधिकारी, श्र्रावक, श्र्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी समडोळी येथे आचार्य शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी जोरदारपणे करण्याचा ठराव करण्यात आला.

आचार्य शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी साजरा करण्याची सुरूवात समडोळी येथूनच 1982 सालापासून सुरू झाली होती. समडोळीला हा मान दुसर्‍यांदा मिळत आहे. या पुण्यतिथी सोहळ्याचे मुख्य संयोजक अरूण पाटील हे आहेत. आचार्य शताब्दी महोत्सवातच पुण्यतिथीचा मान मिळाल्याने समडोळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज