rajkiyalive

ravsaheb patil sangli : सहकार, शिक्षणातील संयमी नेतृत्व रावसाहेब पाटील

ravsaheb patil sangli : सहकार, शिक्षणातील संयमी नेतृत्व रावसाहेब पाटील : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या छोट्याश्या गावात सामान्य कुटुंबात रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा जन्म झाला. वडिल शेतकरी असले तरी सुरुवातीपासून सामाजिक कामात त्यांचा कल होता. लहानपणापासून रावसाहेब पाटील यांना सामाजिक कार्याबरोबर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची आवड होती. उच्च शिक्षणानंतर औषध कंपनी स्थापन करुन ते औषध कंपनीचे मालक असा सुरु झाला. दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजाचे काम, खासगी शिक्षण संस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या माध्यमातून सध्या त्यांची वाटचाल सुरु आहे…..

ravsaheb patil sangli : सहकार, शिक्षणातील संयमी नेतृत्व रावसाहेब पाटील

रावसाहेब पाटील, हे औषध उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, औषध निर्मिती उद्योग, आर्थिक संस्था केमिस्ट असोसिएशन, अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व आहे. स्वदेशी औषध उद्योग समूहाचे संस्थापक आहेत. हा उद्योग समूह एएन आयएसओ 9001-2008 मानांकित असून या कंपनीच्या माध्यमातून 150 ब्रँडचे वितरण केले जाते.

हे सर्व ब्रँड त्यांच्या कंपनीच्या मालकीचे आहेत. स्वदेशी ट्रस्ट ही त्यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था असून त्या ट्रस्टच्या माध्यमातून औषध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना केमिस्ट गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. मोफत औषध उपचार स्वदेशी चा प्रसार व्यसनमुक्ती रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम या ट्रस्टच्यावतीने राबवले जातात.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी औषध व्यवसायीकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीचे कार्य केले आहेत. याशिवाय जकात आंदोलन, एम. आर. पी., 20-20 मेळावा, केमिस्ट भवनची निर्मिती या ठळक गोष्टी यांच्या कार्यकालात झाल्या आहेत. राज्यातील एकमेव अशा सहकार क्षेत्रातील सिंबायोसिस फार्मासिटिकल या औषध निर्मिती प्रकल्पाचे ते संस्थापक व्हाईस चेअरमन होते. या कंपनीत सिपला, लुपिन, ओकासा अशा नामांकित कंपन्यांच्या औषधांचे उत्पादन केले जाते.

केवळ स्वतः औषध कंपनी स्थापन करुन थांबायचे नाही, असा ध्यास कायम राहिला. त्यामुळे त्यांनी फार्मसी कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुढे तिर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलीत डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म) चे संस्थापक चेअरमन आहेत. महावीर स्टेट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे ते चेअरमन असून या संस्थेत ई-लर्निंग सारखी अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. औषध कंपनीच्या माध्यमातून केलेली सेवा लक्षात घेवून त्यांना लायन्स क्लबच्यावतीने ’उद्योग भूषण’ तसेच पार्श्वनाथ ट्रस्टच्या वतीने त्यांना ’उद्योग रत्न’ पुरस्कार मिळाला आहे.

26 वर्षापूर्वी डॉ. आप्पासाहेब चोपडे व आम्ही सर्व संचालकांनी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली. एक रुपये ठेवीचे उद्दिष्ट ठेवून सुरु केलेली संस्था 63 शाखाव्दारे कार्यरत आहे. सध्या 1125 कोटीच्या ठेवी असून 65 हजार सभासद आहेत. काही वर्षापूर्वी संस्थेचा चेअरमन झाल्यानंतर संचालकांनी प्रोत्साहन दिले. पुढील पाच वर्षात 2 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि 100 शाखा काढण्याचे टार्गेट आहे.

सहकार आणि धार्मिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही रावसाहेब पाटील यांचे काम अतुलनिय आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा शिक्षण संस्था संघाचा अध्यक्ष आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
दक्षिण भारत जैन सभेेचे काम करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सांगलीत 50 हजार जैन बांधवांच्या उपस्थितीत ऐतिहासिक अधिवेशन घेतले. नवीन सांस्कृतिक भवन आणि दक्षिण भारत जैन सभेची भव्य इमारत उभारण्याचा मनोदय आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा …..!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज