rajkiyalive

jat vidhansabha 2024 : विक्रमदादांचा तुबची बबलेश्वरचा मास्टरस्ट्रोक

वैभव पतंगे
jat vidhansabha 2024 : विक्रमदादांचा तुबची बबलेश्वरचा मास्टरस्ट्रोक : जत विधानसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पक्की आहे तर विरोधकांमध्ये अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या विक्रम सावंत यांनी कायम सतावणार्‍या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते फ्रंटलाईनवर आले आहेत.

jat vidhansabha 2024 : विक्रमदादांचा तुबची बबलेश्वरचा मास्टरस्ट्रोक

गत निवडणुकीत भाजपाचा चौकार हुकवत त्यांनी आमदारकी गाठली होती. गत आठवड्यात त्यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर तुबची-बबलेश्वरचे पाणी तालुक्याच्या पूर्वभागाला मिळवून दिले आहे. आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली आहे.

जत तालुक्याचे राजकारण गेली 40 वर्षे पाण्याच्या मुद्दाच्या भोवतीच फिरत आहे. तालुक्यात म्हैसाळ योजनेची कामे बर्‍यापेकी पूर्ण झाली असली तरी तालुक्याचा पूर्व भाग हा अद्यापही तहानलेलाच आहे. गत विधानसभा निवडणकित आ. विक्रमदादा सांवत यानी तालुक्यातील पुर्व भागासाठी तुबची बबलेश्वर योजनेतून या भागाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. विरोधकाकडुन यावर बरीच टिका -टिप्पणी करण्यात आली. काल-परवापर्यत अनेकांना कर्नाटकातून जत पाणी येणे अशक्य वाटत होते. मात्र आ. विक्रम सावंत हे आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. आमदार म्हणून निवडणूक आल्यापासून त्यांनी तुबची बबलेश्वर योजनेसाठी पाठपुरावा सुरू केला होता. मंत्र्यालयात पाणी प्रश्नावर आंदोलन करत त्यांनी जतच्या पाणी प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

आमदार झाल्यापासून जत पूर्व भागाला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकष्ठा केली. महाराष्ट्र सरकार बरोबरच त्यांनी कर्नाटक सरकारकडे देखील याबाबत पाठपुरावा केला. सातत्याने विधानसभा अधिवेशनातही पाणी प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते. अनेकवेळा विधानसभा अधिवेशनात आ. सावंत हे पाणी प्रश्नावरून आक्रमक होताना दिसायचे. महाराष्ट सरकानेदेखील पाणी दिले होते. मध्यंतरी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे तीन टीएमसी पाणी मागतले. नेमका हाच मुद्दा पकडुन धरत आ. विक्रम सांवत यांनी महाराष्ट्राने कर्नाटकला पाणी द्यावे, त्याबदल्यात कर्नाटकातून तुबची -बबलेश्वर योजनेतून जतला पाणी सोडण्यास सांगावे अशी मागणी दोन्ही राज्याकडे लावून धरली होती.

आ. सांवत यांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर बसून जत तालुक्याला पाणी मिळणेबाबत आंदोलन केले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या दालनात यावर बैठक घेऊन आ.सावंत यांनी व्यथा मांडली होती. तसेच कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री एम.बी. पाटील यांचीही आ. सावंत हे वेळोवेळी भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी केली होती. त्याचबरोबर आ. सावंत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या व उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचीही भेट घेऊन पाण्याची समस्या सांगून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून पाणी मिळावे हि मागणी केली होती.

आमदर विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नानांना अखेर यश आले आहे. बुधवार 13 आगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तुबची बबलेश्वर योजने चे पाणी जत तालुक्यातील मोटेवाडी, आसंगी तलावात दाखल झाले. त्यामुळे गतविधानसभा निवडणुकीत दिलेल्या अश्वासनाची पुर्ती आ. विक्रम सावंत यांनी केली आहे. त्यामुळे आ. सावंत गट चांगलाच रिचार्ज झाला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज