rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA 2024 : पृथ्वीराजबाबा थांबा, जयश्रीताईंना संधी द्या माजी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI VIDHANSABHA 2024 : पृथ्वीराजबाबा थांबा, जयश्रीताईंना संधी द्या माजी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : सांगली विधानसभेसाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी 2019 ला मी तर 2024 ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील असतील, असा शब्द नगरसेवकांसमोर दिला होता. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी आता थांबावे व विधानसभेसाठी जयश्रीताईंना संधी द्यावी, असा आक्रमक पवित्रा माजी नगरसेवकांनी बैठकीत मांडला आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत संघर्ष आता आणखी तीव्र होणार आहे.

SANGLI VIDHANSABHA 2024 : पृथ्वीराजबाबा थांबा, जयश्रीताईंना संधी द्या माजी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला माजी नगरसेवक अभिजीत भोसले, फिरोज पठाण, संतोष पाटील, प्रशांत पाटील, अजित सूर्यवंशी, शुभांगी साळुंखे यांच्यासह जयश्रीताई पाटील समर्थक उपस्थित होते. या बैठकीत जयश्रीताई पाटील यांना यावर्षी विधानसभेची उमेदवारी मिळणे आवश्यक असल्याचे मत सर्वांनी मांडले.

2019 ला झालेल्या घटनेवर देखील चर्चा करण्यात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पुढील वेळी म्हणजे 2024 ला जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीचा शब्द दिला होता, त्यांनी तो पाळावा असे जाहीर आवाहन केले. याचा घटनाक्रम बैठकीत मांडण्यात आला. 2014 च्या निवडणुकीत मदनभाऊंचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना व भाऊ समर्थकांना वाटल होते की 2019 ला जयश्रीताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार असतील, परंतु 2019 साली अचानकच अनपेक्षितपणे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली.

त्यावेळेस पृथ्वीराज पाटील यांना पूर्ण जाणीव होती की जयश्रीताई पाटील आणि मदनभाऊ समर्थकांच्या पाठिंब्याशिवाय ही निवडणूक जिंकता येणे तर लांबच पण निवडणूक लढवणे देखील शक्य नाही. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी विजय बंगल्याला मदतीची साद घातली. जयश्रीताईंनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी, त्यांची मदत पाठिंबा मागण्यासाठी दि. 3 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 8 च्या सुमारास आले होते.

त्यावेळेस काँग्रेसचे तत्कालिन नगरसेवक व मदभाऊ समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना भावनिक साद घातली होती. ते म्हणाले होते की, विधानसभेला मदत करावी लागेल. तुमच्या मदती शिवाय ही निवडणूक लढवणे शक्य नाही.

त्यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या होत्या की, आम्ही सोबत आहोत काळजी करू नका. आणि जागेवर कार्यकर्त्यांना पृथ्वीराज पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर पृथ्वीराज पाटील यांनी मदनभाऊंच्या प्रतिमेसमोर शब्द दिला होता की यंदा तुम्ही मला मदत करताय पण पुढच्या वेळेस जयश्रीताई पाटील तुमची उमेदवारी मी मान्य करून सोबत असेल. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी 2019 ला दिलेला शब्द पाळावा आणि थांबावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून आता चांगलाच वाद रंगणार आहे.

2024 ची विधानसभा जयश्रीताईंनी लढवावी..

2019 च्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी स्व.मदनभाऊ पाटील यांच्या विजय बंगल्यावर पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताईंना शब्द दिला होता की 2019 ला मी लढणार आहे. तर 2024 ची निवडणूक जयश्रीताई लढवतील. यावेळी काँग्रेसचे तत्कालिन नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे 2024 ला जयश्रीताई पाटील यांना उमेेदवारी मिळणे अपेक्षित आहे. तर पृथ्वीराज पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, असे मत माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज