rajkiyalive

छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इस्लामपूरात राष्ट्रवादीची मागणी

इस्लामपूर ः प्रतिनिधी
छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इस्लामपूरात राष्ट्रवादीची मागणी : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळणे, राज्य सरकारची अक्षम्य चूक असून राज्यातील जनता राज्य सरकारला माफ करणार नाही. अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. राज्य सरकारने या घटनेची जबाबदारी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इस्लामपूरात राष्ट्रवादीची मागणी

तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटूगडे, सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर, सुशांत कुर्‍हाडे, विशाल माने यांनी दुदैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत राज्य सरकारवर हल्ला चढविला.

प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, पै. भगवान पाटील, अँड.चिमण डांगे, बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील, पुष्पलता खरात, दादासाहेब पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, माणिकराव पाटील, कमल पाटील, रोझा किणीकर, मुकुंद कांबळे, कार्तिक पाटील, धैर्यशिल पाटील, अलका माने, दिग्विजय पाटील, दीपाली साधू, संजय जाधव, गोपाळ नागे, विशाल सुर्यवंशी, मोहन भिंगार्डे यांच्यासह पक्षाचे जेष्ठ, युवक, महिला, राजारामबापू समूहातील पदाधिकारी व विविध सेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज