rajkiyalive

tasgaon vidhansabha 2024 : लोकसभेला हिसका दाखवला, विधानसभेला आस्मान दाखवू

कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी):-

tasgaon vidhansabha 2024 : लोकसभेला हिसका दाखवला, विधानसभेला आस्मान दाखवू : आम्हाला विश्वासघातकी म्हणणार्‍यांना लोकसभेला हिसका दाखविला आहे, आता येणार्‍या विधानसभेला आस्मान दाखवू असा इशारा रोहित पाटील यांनी दिला. तसेच स्व आर.आर.आबा पाटील यांच्या विकासाच्या स्वप्नांची पूर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सुरेश पाटील म्हणाले.

tasgaon vidhansabha 2024 : लोकसभेला हिसका दाखवला, विधानसभेला आस्मान दाखवू

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पाटील यांच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कर्तव्य यात्रेचा सांगता सभारंभ मळणगाव येथे आयोजित जाहीर सभेत युवा नेते रोहितदादा व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील बोलत होते. युवानेते रोहित पाटील व आमदार सुमनताई पाटील यांनी शिरढोण ते मळणगाव अशी हजारो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढली. मळणर्गाी येथे पदयात्रेचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले.

रोहित पाटील म्हणाले, माझ्या कर्तव्याची जाणीव करून घेण्यासाठीच मी कर्तव्य यात्रा काढली आहे. भविष्यात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मला साथ देण्याचेे आवाहन युवानेते रोहित पाटील यांनी केले. दरम्यान माझ्या पुतण्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात जनता व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तुम्हाला आस्मान दाखवू.असा खणखणीत इशारा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी विरोधकांना दिला.

स्व.आर.आर.पाटील यांची पुण्याई व आमदार सुमनताई पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सुरेश भाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने आपण तासगाव विधानसभा मतदार संघांमध्ये जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कर्तव्ययात्रा काढली. यामुळे मी गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलो. कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केले.आणि या प्रेमाची उतराई म्हणून जनतेसाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहण्याचा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती , शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हेच या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न आहेत. यासह उर्वरित प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी आहे, असा शब्द रोहित पाटील यांनी दिला. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी व्हावी असे स्व. आर.आर. आबा पाटील यांचे स्वप्न होते. परंतु शेतकरी विरोधी शक्तींनी त्यावेळी आबांचा प्रयत्न हाणून पाडला. आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगेवाडीमध्ये एमआयडीसी उभी करण्यात येत आहे.असे स्पष्ट करून आरोग्य, शिक्षण रस्ते व मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी मला विधानसभेच्या निवडणुकीत आशीर्वाद द्या, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले.

आमचे विरोधक आम्ही विश्वासघात केला असे सांगत सुटले आहेत. कोणी विश्वासघात केला. हे सर्वांना माहीत आहे. माझ्या पुतण्याच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची भाषा होते. निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात जनता व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आस्मान दाखवू. असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी दिला. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोहित दादा पाटील यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन युवा नेते शंतनू भैया सगरे यांनी दिले.

उद्याच्या विधानसभा निवडणुकीत तासगाव तालुक्यातून रोहित दादा पाटील यांना चाळीस हजाराचे मताधिक्य देऊ अशी हमी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. तर कवठेमंकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील यांनी रोहित पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी वैभव पाटील, डी.ए.माने, राहुल पाटील, गणेश पाटील यांची भाषणे झाली. दिग्विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर अजित शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी सगरे, माजी सभापती विकास हाक्के, दादासाहेब कोळेकर, सुरेखा कोळेकर, माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई कांबळे, कुमार पाटील, चंद्रशेखर सगरे, शिवाजीराव कदम, अमित कोळेकर, निलम पवार, मळणगावच्या सरपंच सुरेखा जाधव, मीनाक्षी माने, बाळासाहेब पाटील, अर्जुन गेंड, अमर शिंदे, बद्रुद्दीन शिरोळकर ,महेश पाटील, संजय वाघमारे, राहुल जगताप, रवी माने, सम्राट भोसले आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज