rajkiyalive

shantisagar maharaj punyathiti : समडोळीत पहिली पुण्यतिथी

dineshkumar aitawade 9850652056

shantisagar maharaj punyathiti : समडोळीत पहिली पुण्यतिथी :विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य 108 प. पू. शांतीसागरजी महाराज यांची 69 वी पुण्यतिथी मिरज तालुक्यातील समडोळी येथे 5 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी होत आहे. समडोळी या गावाला हा मान दुसर्‍यांदा मिळाला. यापूर्वी 1982 मध्ये समडोळी गावामध्ये शांतीसागरज महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली होती.

shantisagar maharaj punyathiti : समडोळीत पहिली पुण्यतिथी

खंडीत झालेली मुनीपरंपरा आचार्य शांतीसागरजी महाराज यांनी सुरू केली. त्यामुळे समडोळीतील समस्त श्रावकांनी शांतीसागर महाराजांना 1924 मध्ये दसर्‍या दिवशी आचार्य ही पदवी दिली. त्यामुळे ते जैन समाजातील प्रथमाचार्य म्हण्ाून ओळखले जावू लागले. आचार्य शांतीसागर महाराजांची महिमा संपूर्ण समाजाला कळावी म्हणून वीर सेवा दलाचे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी जोरदारपणे करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी समडोळी हे गाव ठरविले. त्यामुळे आचार्य शांतीसागर महाराज यांची 27 वी पुण्यतिथी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात साजरी झाली. त्यावेळीपासून शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी एका गावात साजरी होवू लागली. जैन समाजातील सर्वसामान्य श्र्रावकांना या महोत्सवाची नेहमीच आतुरता असते.

शुक्रवार 20 ऑगस्ट 1982 रोजी समडोळी या गावी दक्षिण भारत जैन सभा आणि वीर सेवा दलाने बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुढाकाराने समडोळीत शांतीसागर महाराज पुण्यतिथीचे आयोजन केले. संघटनेच्यावतीने संपन्न झालेल्या चारित्र्य चक्रवर्ती शांतीसागर महाराज यांच्या अविस्मरणीय अशा पुण्यतिथी सोहळा झाला.

सकाळी आठ वाजता गावचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सनई चौघड्याच्या मंगल निनादाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
आदी वृषभके पूत्र महान
भारत देश महान या ध्वजगीताने वीर सेवा दल सैनिकांच्या धर्मध्वजाला विनम्र अभिवादनाते या भावपूर्ण सोहळ्यास सुरूवात झाली. त्यानंतर विश्वधर्म प्रसारक प. पू. श्री 108 एलाचार्य विद्यानंद मुनीमहाराज यांच्या शुभाशिर्वादाने व प्रेरणेने द. भा. जैन. सभेच्या अध्यक्षा सौ. शरयुताई अरविंद दफ्तरी यांनी तयार केलेल्या शाकाहार प्रदर्शनाचे उद्घाटन समडोळी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासो पारीसा खोत यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी जैन समाजचे युवा कार्यकर्ते व वीर सेवा दलाचे संघटक शाकाहार विभाग प्रमुख अजित सगरे यांनी आपण दैनंदीन जीवनात शाकाहार का घेतला पाहिजे, शाकाहार व मांसाहार यातील फरक समजावून सांगून आपल्या निकोप, प्रभावी व्यक्तिमत्वासाठी शाकाहार आवश्यक आहे त्याच बरोबर समाजामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे ती नाहीशी करून सर्वत्र समता, सुख, समाधान पाहिजे असेल शाकाहार आहार घेण्याचे सांगितले.

दुपारच्या सत्रात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा वीर सेवा दलाच्या जडणघडणीत ज्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे, असे कुशल संघटक, जयसिंगपूरचे पायगोंडा पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देवून कलेची जोपासणा करणे अत्यंत गरजेचे आहे व ते कार्य वीर सेवा दल करीत आहे असे सांगितले. या स्पर्धेमध्ये माझा आवडता भारतीय संत गुरूदेव समंतभद्र महाराज या विषयावर बाहुबली विद्यापिठाचा विद्याथी कु. उदयकुमार पाटील याला प्रथम क्रमांक मिळाला. 101 रूपयाचे पारितोषीक धर्मग्रंथ व प्रशस्तीपत्रक त्याला देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ समडोळी गावचे ज्येष्ठ नेते जि. सु. पाटील यांच्याहस्ते पार पडले.

दिृतीय क्रमांक विभागून कु. जी. एस. पाटील व ए. एस. कवठेकर दोघेही समडोळी यांना देण्यात आले. तृतीय क्रमांक एम. डी. कोळी व एस. बी. चौगुले यांना विभागून देण्यात आले. सुहास मगदुम व मोहन राजोबा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

108 चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागर महाराज पुण्यतिथी कार्यक्रम
सकाळी 8 वाजता ध्वजवंदन
सकाळी 8.30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन
शाकाहार प्रदर्शन
प.पू. महाराजांच्या ग्रंथांच्या व छायाचित्राचे प्रदर्शन
रांगोळी प्रदर्शन
सकाळी 9.15 ते 10 अ‍ॅड. बाबासाहेब कुचनुरे यांचे व्याख्यान चारित्र्य चक्रवर्ती

सकाळी 10 ते 12 वक्तृत्व स्पर्धा
दुपारी 12 ते 2 भोजन व विश्र्रांती
दुपारी 2 ते 3.30 प. पू. महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक

सायंकाळी 4 वाजता पुण्यतिथी समारंभ
पाहुण्यांचे भाषण – डॉ. सुभाष आक्कोळे
अध्यक्षीय भाषण -डॉ. धनंजय गुंडे
रात्री 8.30 वाजता करमणूक बुध्दीराज धार्मिक ज्ञान व मनोरंजन पार्टी, मजरेवाडी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज