rajkiyalive

sangli crime news : ऑरबिट क्रॉपमध्ये कर्मचार्‍यांचा 23 लाखाचा डल्ला

 

सांगली :

sangli crime news : ऑरबिट क्रॉपमध्ये कर्मचार्‍यांचा 23 लाखाचा डल्ला : शहरातील विजयनगर येथे असलेल्या ऑरबिट क्रॉप मायक्रोयुनिट्स या कंपनीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी एका बँकेच्या शाखाअधिकार्‍याशी हातमिळवणी करून लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. विश्वासाने दिलेल्या कोर्‍या चेकवर परस्पर रक्कम टाकून तब्बल 23 लाख 25 हजार 284 रुपयांची फसवणूक केली. सदर फसवणुकीची घटना हि सण 2018 ते दि. 05 ऑक्टोबर 2023 अखेर घडली. या प्रकरणी व्यावसायिक दीपक प्रकाश राजमाने (वय 41 रा. दत्तनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

sangli crime news : ऑरबिट क्रॉपमध्ये कर्मचार्‍यांचा 23 लाखाचा डल्ला

दीपक राजमाने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हेड अकाउंटंट उत्तम महावीर अडसूळ (वय 37), असिस्टंट अकाउंटंट सौ. भाग्यश्री उत्तम अडसूळ (वय 33 दोघे रा. कुपवाड), रविराज मुरग्याप्पा पळसे (वय 42 रा. सांगली) आणि युनिअन बँकेचे शाखाधिकारी विवेक रंजन (रा. सांगली) अशी गुन्हा दखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, दीपक राजमाने हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील दत्तनगर परिसरात राहतात. त्यांची शेती औषध तयार तयार करण्याची ऑरबिट क्रॉप मायक्रोयुनिट्स हि कंपनी आहे. या कंपनीमध्ये संशयित अडसूळ पती-पत्नी आणि रविराज पळसे हे काम करत होते. सण 2019 ते सण ऑक्टोबर 2023 या कालावधीत राजमाने यांनी कंपनीच्या देखभालीसाठी तसेच कामगारांच्या पगाराकरिता कोरे चेक संशयितांकडे ठेवले होते.

संशयित कामगारांनी विश्वास संपादन करून युनियन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील शाखाधिकारी संशयित विवेक रंजन यांना हाताशीधरून कोर्‍या चेक वर रक्कम टाकून पैसे काढले तसेच कंपनीच्या वसुली अधिकार्‍यांनी वसुली केलेली रक्कम हि परस्पर संशयित उत्तम अडसूळ यांच्या बँक खात्यावर टाकून फसवणूक केली. सदर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच दीपक राजमाने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज