rajkiyalive

jayant patil on rohit patil : तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ द्या 

तासगाव :

jayant patil on rohit patil : तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ द्या  : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ङ्कराष्ट्रवादी शरदचंद्र पवारङ्ख पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी रोहित पाटील यांचा विधानसभेला विजय निश्चित असल्याचे म्हणाले. यामुळे रोहित पाटील यांनी महाराष्ट्रातही फिरले पाहिजे, विरोधकांमध्ये आणि रोहित पाटील यांच्यात मोठा फरक असणार असंही जयंत पाटील म्हणाले.

jayant patil on rohit patil : तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ द्या 

जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील पाटील यांचा विजयाबाबत भाष्य केले. रोहित पाटील यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरण्याबाबतही भाष्य केले, यामुळे आता विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील राज्यात प्रचारासाठी दौरा काढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आरआर पाटील आबा यांनीही पक्षासाठी याआधी प्रचारसभा घेतल्या होत्या. आबांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी होती. रोहित पाटील यांचीही आरआर आबांसारखीख भाषण करण्याटची पद्धत आहे, त्यामुळे रोहित पाटील यांना निवडणूक काळात राज्यातून मोठी मागणी असल्याचे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले, आता राज्यात वातावरण बदलले आहे. रोहितदादांनी सांगितले की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आहे. आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल, तुम्ही आता महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही. कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे, तुम्ही त्याची काही चिंता करु नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, आपला पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

सुमन ताईंना अनेकांचा फोन आला

आपल्या पक्षातून बरीच लोक बाहेर गेली, काही लोक गेल्यानंतर सुमनताईंना किती फोन येत होते, किती दबाव होता मला माहित आहे. त्या दबावाला बळी पडल्या नाही, त्यांनी पवार साहेब जिथे असतील तिथे आम्ही असणार असं सांगितलं. ही एकनिष्ठता पाहिजे, असंही पाटील म्हणाले. पूर्वी लोक म्हणायचे यांना उमेदवार मिळणार नाहीत. पण, आता वातावरण बदलले आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन,तीन उमेदवार उमेदवारी मागत आहेत. उद्याची विधानसभा होईल त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज