rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : मिरजेत भाजपची डोकेदुखी वाढली…

संदीप तोडकर
miraj vidhansabha 2024 : मिरजेत भाजपची डोकेदुखी वाढली… : विधानसभा निवडणुक जस जशी जवळ येत आहे तस तसे मिरज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. विशेषता: भाजपची डोकेदु:खी वाढली आहे. विजयाची हॅट्रीक केलेल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात पक्षातीलच मोहन व्हनखंडे यांनीच डोके वर काढले आहे. जनसुराज्यच्या मदतीने त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मिरज मतदार संघात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे.

miraj vidhansabha 2024 : मिरजेत भाजपची डोकेदुखी वाढली…

मिरज मतदारसंघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र हा किल्ला 2009 च्या दंगलीत ढासळला. 2009 च्या दंगलीत भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी विजय मिळवला. राज्यात 2014 नंतर मोदी लाटेत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतपर्यंत भाजपची सत्ता आली. 2014 विधानसभेला परत ना. सुरेशभाऊ खाडे यांनी विजय मिळवला. 2019 मध्ये विजय मिळवून त्यांनी हॅटट्रीक केली. याच काळात त्यांनी आपला ग्रामीण भागातील जनसंपर्क वाढवला. तसेच जिल्हापरिषद व महानगरपालिकेत सत्ता मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरली.

मिरज तालुक्यातून जिल्हापरिषदेवर त्यांनी मोठ्या संख्येने सदस्य निवडून दिले.

त्यामुळे भाजपला जिल्हा परिषेदची सत्ता मिळवता आली. तसेच त्याचवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत चांगली गटबांधणी करुन महापालिकेतही मिरजेतून नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून दिले परिणामी मिरजेला महापौरपदाचा मान मिळाला. तसेच जिल्हापरिषद अध्यक्षपदही मिळाले. इतिहासात प्रथमच मिरज पंचायत समितीत सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्ता मिळाली. हे करत असताना सुरेशभाऊंनी ग्रामीण विकासाला महत्व दिले. तसेच मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आणल्या. हे सगळे सुरळीत सुरू असतानाच भाजपला हा मतदार संघ सर्वात सुरक्षित मानला जात असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने मिरजेतील वातावरण बदलू लागले आहे.

अपक्ष खासदार विशाल पाटील यांना या मतदार संघातून अभूतपूर्व पंचवीस हजार मतांचे लिड मिळाले.

यामध्ये मिरज पॅटर्न पुन्हा सक्रिय झाल्याचे पहावयास मिळाले. या लीडमुळे महाअघाडीतील उमेदवारांना आपण विजय होऊ शकतो याची खात्री वाटू लागली आहे. त्यातच भाजपमधील अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. भाजपचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोहन वनखंडे यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छूक आहोत. आपण पक्षाचे गेल्या 20 वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे आपणास उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांचे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याशी चांगले सख्य आहे. जनसुराज्य पक्षानेही आता मिरज व जत मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये इच्छूकांची संख्या वाढली आहे. त्याबरोबर प्रा.सिद्धेश्वर जाधव यांनी लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. शिवसेनेकडून प्रा. सिद्धेश्वर जाधव हे शिवसेनेकडून इच्छूक आहेत. सी. आर. सांगलीकर हे देखिल काँग्रेसमधून लढण्यास इच्छूक आहेत.

गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीच्या तिकीटावर लढून 65 हजार मते घेणार्‍या बाळासाहेब होनमोरे यांनी यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारीस इच्छुक असल्याचे सांगितले आहे. सर्वच नेत्यांनी मतदार संघातील मतदारांशी संवाद साधला आहे. विशेषत: भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस लागली आहे. एकंदरीत भाजपला सोपा असणारा मतदार संघ लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसलाही सोपा वाटू लागला आहे. भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्यामुळे उमेदवारीवरून बंडखोडी होण्याची शक्यता असून, खाडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज