rajkiyalive

SANGLI NEWS : माझी वसुंधरा अभियानमध्ये समडोळीला राज्यस्तरावर उत्तेजनार्थ 75 लाखाचे बक्षीस

SANGLI NEWS : माझी वसुंधरा अभियानमध्ये समडोळीला राज्यस्तरावर उत्तेजनार्थ 75 लाखाचे बक्षीस : माझी वसुंधरा चार अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेचा राज्यात प्रथम आला. पृथ्वी वायु जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 राबवण्यास सुरुवात झाली. माझी वसुंधरा अभियान चार हे एक एप्रिल 2023 ते दिनांक 31 मे 2024 कालावधीत राबवण्यात आले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदकडील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता.

SANGLI NEWS : माझी वसुंधरा अभियानमध्ये समडोळीला राज्यस्तरावर उत्तेजनार्थ 75 लाखाचे बक्षीस

समडोळी ग्रामपंचायतीनेही या अभियानमध्ये भाग घेतला होता. राज्यस्तरावर समडोळीची दखल घेतली असून, समडोळी ग्रामपंचायतीला 75 लाखाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. सांगली बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली समडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. सुनिता हजारे, उपसरपंच अमजद फकीर, ग्रामविकास अधिकारी जेरूर, माजी उपसरपंच कृष्णाजी मसाले, माजी उपसरपंच प्रमोद ढोले व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले होते.

यामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे ग्रामपंचायत गटामध्ये दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले कासेगाव ही राज्यामध्ये तृतीय क्रमांक आली. राज्यस्तर उत्तेजनार्थ पुणे विभागात येळावी व कवलापूर ह्या ग्रामपंचायती आलेल्या आहेत
पाच हजार ते दहा हजार या लोकसंख्या गटामध्ये येडी निपाणी ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे तसेच भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरी मध्ये ग्रामपंचायत प्रथम आली आहे राज्यस्तरावर उत्तेजनार्थ वाटेगाव समडोळी या दोन ग्रामपंचायती आलेल्या आहेत, विभाग स्तरावर वसगडे व नागठाणे या दोन ग्रामपंचायती

अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये नांगोले ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम आलेली आहे तसेच पुणे विभागामध्ये बोरगाव व घाटनांद्रे या ग्रामपंचायती क्रमांकात आलेले आहेत भूमी थिमॅटिक मध्ये उंच उडी प्रकारात लंगरपेठ ग्रामपंचायत उत्तेजनार्थ आले असून पुणे विभागामध्ये बनेवाडी व खंडोबाची वाडी या दोन ग्रामपंचायत क्रमांकात आले आहेत भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीमध्ये पुणे विभागामध्ये कुंडलापूर व कौलगे या दोन ग्रामपंचायती क्रमांक आल्या आहेत.

वरील अभियानामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे ,पंचायत विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी ,ग्रामसेवक सरपंच ,ऑपरेटर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याने सदरच्या ग्रामपंचायती व जिल्हा परिषद राज्यात यशस्वी होऊ शकली याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज