rajkiyalive

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ तालुक्यात ’भाजपची वेट अँड वॉच’ ची भूमिका!

कार्यकर्त्यांनी जरा दमाने घ्यावे वरिष्ठांचे आदेश: कार्यकर्ते संभ्रमात

जयसिंगपूर/ अजित पवार

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ तालुक्यात ’भाजपची वेट अँड वॉच’ ची भूमिका! : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवस उरले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यात मात्र भाजपने ’वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. हा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्या घटकपक्षाकडे जातो यावर भाजपची पुढची रणनीती आखली जाणार आहे. या निवडणुकीसाठी जरा दमानेच घ्या असे आदेश वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

SHIROL VIDHANSABHA : शिरोळ तालुक्यात ’भाजपची वेट अँड वॉच’ ची भूमिका!

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर महायुतीच्या नेत्यांनीही जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच शरद पवार यांनी कागल येथे येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. शाहू कारखान्याचे सर्वेसर्वा समरजीतसिंग घाटगे यांच्या हाती तुतारी देऊन नवचैतन्य निर्माण केले आहे.

या पार्श्वभूमीवर कालच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याच्या दृष्टीने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांबाबत अनेकांशी त्यांनी चर्चा केली आहे. या निवडणुकीत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष अशी आघाडी होऊन निवडणुकीची समीकरणे आखली जाणार जाणार आहेत.

शिरोळ तालुक्यात तसे पक्षीय बालाबाल पाहिले तर कधीही कोणत्या पक्षाला झुकते माप न देणारा, पण गटतट मानणारा, जातीय समीकरणांची बेरीज घालणारा तालुका राहिला आहे. या तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण या निवडणुकीत उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. पण महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील समन्वय साधला तर एकास एक लढत होण्याची शक्यता आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले तुल्यबळ या निवडणुकीत दाखवू शकते.

महायुतीचे घटक असलेले विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याकारणाने त्यांच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला तर काय करायचे या उद्देशाने तालुक्यातील भाजपने ’वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांसह नेतेमंडळी संभ्रमात पडली आहे. यामुळे महायुतीच्या कोणत्या पक्षाकडे अथवा मित्र पक्षाकडे हा मतदारसंघ जातो यावर भाजपची पुढची रणनीती समजली जाणार आहे.

कार्यकर्त्यांनी दमाने घ्यावे…

ही निवडणूक भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. पण महायुतीच्या या तिकीट वाटतात कोणाकडे मतदारसंघ जातो, यावर भविष्यातला उमेदवार ठरणार आहे. ’जरा कार्यकर्त्यांनी दमाने घ्यावे’ असे आदेश वरिष्ठांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज