पंतप्रधान शेतकरी सन्मानचा हप्ता खात्यावर जमा, रब्बीच्या पार्श्वभूमीवर दिलासा
जनप्रवास । सांगली
pm kisan yojna : जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकर्यांना आले 70 कोटी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारकडून घोषणांवर पाऊस पडत असताना शनिवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अठरावा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकर्यांच्या बँक खात्यावर तब्बल 70 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर महिन्याची रक्क्म जमा होत असताना शेतकर्यांच्या खात्यावर 2 हजार जमा झाल्याने चेहर्यावर आनंद दिसत होता.
pm kisan yojna : जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकर्यांना आले 70 कोटी
देशातील शेतकर्यांचे आर्थिक जीवनमान उंचावून आधार देण्यासाठी 2019 मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकर्यांना शेतकरी कुटुंबास दोन हजाराप्रमाणे वर्षाला तीन हप्ते दिले जातात. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकर्यांच्या बँक खात्यावर सतरावा हप्ता वर्ग करण्यात आला होता. राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, पुढील महिन्यात दिवाळीचा सण आहे.
तत्पूर्वी केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मागील तीन महिन्यांपासून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या बँक खात्यावर प्रथम 3 हजार, त्यानंतर साडेचार हजार जमा होवू लागले. दोन दिवसांपासून ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये जमा होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणार्या हप्त्याची वाट पाहत होते. मात्र, आता शेतकर्यांची प्रतीक्षा संपली.
यंदा दमदार पाऊस झाला असून रब्बीच्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करीत आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार रुपये झाले आहेत. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकर्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. त्यामुळे या पैशांची शेतकर्यांना मदत होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.