rajkiyalive

raju shetti news : जयसिंगपुरात स्वाभिमानीची 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला

जयसिंगपूर/ प्रतिनिधी
raju shetti news : जयसिंगपुरात स्वाभिमानीची 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणारी 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार आहे. त्याबरोबरच गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रूपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

raju shetti news : जयसिंगपुरात स्वाभिमानीची 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला

उदगाव (ता. शिरोळ) येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले, देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे. साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले आहेत. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफ. आर. पी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत. राज्य सरकार कारखादारांच्या पाठिशी असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना संघर्षाशिवाय काहीच पडणार नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे.

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, चळवळीतील ताकत व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देवू शकते.

यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील. शेतकरी संघटीत करण्याचे काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय उभा राहिला आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यास सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, विठ्ठल मोरे, अजित पोवार, सचिन शिंदे, राजाराम देसाई, राम पाटील, पोपट मोरे यांच्यासह पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक शैलेश आडके तर सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज