rajkiyalive

islampur vidhansabha 2024 : इस्लामपुरात महायुतीची उमेदवारासाठी भटकंती ; जयंतरावांची प्रचारात मुसंडी

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

islampur vidhansabha 2024 : इस्लामपुरात महायुतीची उमेदवारासाठी भटकंती ; जयंतरावांची प्रचारात मुसंडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरु होते की यंदा जयंत पाटील यांच्या विरोधात कोण उभे राहाणार व जयंत पाटील कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार. त्याला कारण देखील तसेच आहे. गेल्या 7 विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर जयंत पाटील यांच्या विरोधात एकदा उभारलेला उमेदवार पुन्हा दुसर्‍यांदा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत नाही. एकतर तो जयंत पाटील यांच्या बाजुने जातो नाहीतर सक्रिय राजकारणातून अलिप्त राहतो.

islampur vidhansabha 2024 : इस्लामपुरात महायुतीची उमेदवारासाठी भटकंती ; जयंतरावांची प्रचारात मुसंडी

एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार जयंत पाटील यांची उमेदवारी अंतिम असताना विरोधी बाजूने महायुतीची उमेदवारासाठी भटकंती सुरू असलेली पहायला मिळत आहे. भाजप शिवसेना युती असल्यापासून इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. गेल्या वेळीही ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. वाळव् ाचे गौरव नायकवडी शिवसेनेकडून उभे राहिले. त्यामुळे निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली.

यंदाच्या निवडणुकीत नेमकी ही जागा कोणत्या पक्षाला जाणार हेे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे आ. जयंत पाटील समर्थकांनी मागील 5 वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा पुस्तक व बॅनरबाजी करत एक प्रकारे प्रचारात मुसंडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून जयंत पाटील समर्थक चांगलेक सक्रिय झालेले दिसून येत आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावात जयंत पाटील यांनी केलेल्या विकासकामांचे डिजिट पहायला मिळत आहे. जयंत पाटील यांच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते होम टू होम प्रचारावर जोर देत आहेत. पक्षाचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस चे स्टीकर गाड्यावर दिसत असून, घरटी चिन्ह पोहोचविण्यात जयंत पाटील समर्थक यशस्वी झाले आहेत.

साहेब तुम्ही राज्य सांभाळा आम्ही मतदार संघ सांभाळतो

जयंत पाटील यांना निवडणूक लागल्यानंतर महाराष्ट्रभर फिरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आत्ताच मतदार संघ पिंजून काढला आहे. सर्वच गावातील कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही निवांत महाराष्ट्रभर भिरा, आम्ही गड सांभाळतो असे वचन दिले आहे.
जयंत पाटलांचे गेल्या सात निवडणुकीत कमीत कमी मताधिक्य 32 हजाराचे असून, जास्तीत जास्त मताधिक्य 85 हजाराचे आहे.
जयंत पाटील कायमच 60 टक्केच्यावर मते घेत आले आहेत.

उरलेल्या सर्वांना 40 टक्के मते मिळत आहे. त्यामुळे 60 टक्केच्यावर मते खेचणाराच जयंत पाटील यांचा पराभव करू शकेल. परंतु सध्या तरी तसे शक्य वाटत नाही. 1990 च्या पहिल्या निवडणुकीत जयंत पाटील काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते. त्यांच्या विरोधात सर्वांनी मिळून आष्ट्याचे विलासराव शिंदे यांना उभे केले. यावेळी जयंत पाटील यांना 81 हजार 18 मते मिळाली तर विलासराव शिंदे यांना 48 हजार 459 मते मिळाली. सुमारे 60 टक्के मते जयंत पाटील यांना मिळाले. ते 32 हजार 559 मतांनी निवडून आले.

1995 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्याच निवडणुकीत उभे राहिले.

त्यांच्या विरोधात भाजपने अशोक पाटील यांना उभे केले. या निवडणुकीत जयंत पाटील यांना 94 हजार 605 तर अशोक पाटील यांना 31 हजार 394 मते मिळाली. या निवडणुकीत 65 टक्के मते मिळवून जयंत पाटील 63 हजार 211 मतांनी निवडून आले.

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. जयंत पाटील राष्ट्रवादीत गेले.

राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात भाजपने सी. बी. पाटील यांना उभे केले. यावेळी जयंत पाटील यांना 83 हजार 112 तर सी. बी. पाटील यांना 29 हजार 162 मते मिळाली. 61 टक्के मते घेवून जयंत पाटील 53 हजार 950 मतांनी निवडून आले.

2004 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जयंत पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिले.

यावेळी भाजपने उमेदवार उभे केला नाही. त्यामुळे रघुनाथ पाटील यांची स्वतंत्र भारत पक्षातून उमेदवारी राहिली. यावेळी जयंत पाटील यांना 1 लाख 20 हजार 830 तर रघुनाथ पाटील यांना केवळ 35 हजार 740 मते मिळाली. 74 टक्के मते मिळवून जयंत पाटील 85 हजार 90 मतांनी निवडून आले.

2009 च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात मतदार संघांची पुनर्रंचना झाली.

वाळवा नाव बदलून इस्लामपूर मतदार संघ झाले. जयंत पाटील यांच्या स्वत:च्या गावासह 49 गावे नव्या शिराळा मतदार संघात गेले मिरज तालुक्यातील आठ गावे इस्लामपूर मतदार संघात आले. त्यामुळे या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित आहे, असे सर्वार्ंना वाटू लागले. त्यामुळे सर्वार्ंनी मिळून वाळव्याच्या वैभव नायकवडींना उभे केले. परंतु याही निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 10 हजार 673 मते मिळाली तर वैभव नायकवडींना केवळ 56 हजार 165 मते मिळाली. 64 टक्के मते मिळवून जयंत पाटील पुन्हा एकदा 54 हजार 508 मतांनी निवडून आले.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.

जयंत पाटील राष्ट्रवादीकडून तर बोरगावचे जितेंद्र पाटील काँग्रेसकडून उभे राहिले. चिकुर्डेचे अभिजित पाटील अपक्ष होते. या निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 13 हजार 45 मते मिळाली तर अभिजित पाटील यांना 37 हजार 859 मते मिळाली जितेंद्र पाटील यांना केवळ 18 हजार 187 मते मिळाली. यावेळी 62. 5 टक्के मते घेवून जयंत पाटील 75 हजार 186 मतांनी निवडून आले.

गेल्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने वाळव्याच्या गौरव नायकवडींना उमेदवारी दिली.
परंतु निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. येथे पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष असणार्या निशिकांत पाटील यांना जादा मते मिळाली. जयंत पाटील यांना 1 लाख 15 हजार 563 मते मिळाली तर निशिकांत पाटील यांना 43 हजार 396 मते मिळाली. गौरव नायकवडींना 35 हजार 668 मते मिळाली. 58 टक्के मते मिळवून जयंत पाटील 72 हजार 169 मतांनी निवडून आले.

जयंत पाटील यांच्या विरोधातले आजपर्यंतचे उमेदवार

या सातही निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सातही निवडणुकीत त्यांच्या समोर जे जे निवडणुकीला प्रमुख उमेदवार होते ते परत त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आले नाहीत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत विलासराव शिंदे, रघुनाथदादा पाटील, बाबा सूर्यवंशी, प्रा. विश्वास सायनाकर, अशोक पाटील, सी.बी.पाटील आप्पा, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, जितेंद्र पाटील, गौरव नायकवडी आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आजपर्यंत पराभव केला आहे. जयंत पाटील यांचे 2014 मधील 75 हजाराचे मताधिक्य आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य आहे.

जयंत पाटलांचे मताधिक्य

जयंत पाटील यांना 1990 पासून 32559, 63211, 53950, 85090, 54508, 75186 आणि 72169 असे मताधिक्य मिळत गेले. तसेच त्यांना 60, 65, 61, 74, 64, 62 आणि 58 टक्के एकून मतदानाच्या मते मिळाली

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज