rajkiyalive

ichalkaranji vidhansabha election 2024 : इचलकरंजीतून डॉ. राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार

यादी जाहीर होताच जल्लोष

इचलकरंजी :

ichalkaranji vidhansabha election 2024 : इचलकरंजीतून डॉ. राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार : भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच आवाडे कुटुंबियांसह संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोेष साजरा करण्यात आला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी आनंद व्यक्त करताना विद्यमान आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर या दोन दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनखाली विधानसभा निवडणूकीत मोठ्या फरकाने विजयी मला जनता आमदार म्हणून निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ichalkaranji vidhansabha election 2024 : इचलकरंजीतून डॉ. राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार

दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा महायुती भाजपा समन्वयक अशोक स्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी निपाणीच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले, भाजपा प्रदेश सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, गजानन सुलतानपुरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. तर सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे हे शहर भाजपा कार्यालयात प्रवेश करणार आहेत.

सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीला बिनर्शत पाठींबा दिला होता. मागील पाच वर्षे ते भाजपासोबत घटक पक्ष म्हणून प्रामाणिक राहिले. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपातर्फे डॉ. राहुल आवाडे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते. तत्पूर्वी 15 ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणूकीसाठी डॉ. राहुल आवाडे हेच उमेदवार असल्याचे जाहीर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीत येऊन भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावात घेत सर्वांना पक्षाची शिस्त व निष्ठावंतांना न्याय मिळणारच असे सांगत विधानसभा निवडणूकीसाठी डॉ. राहुल आवाडे हेच भाजपाचे उमेदवार असतील असे सूतोवाच करत सर्वांची नाराजी दूर केली होती. तेव्हापासून भाजपाची यादी कधी जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी दुपारी भाजपाच्या वतीने 99 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल आवाडे यांचे नांव जाहीर होताच ‘इंदुकला’ निवासस्थानासह संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाला उधाण आले. जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दोन मातब्बर अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या राजकीय जीवनातील महत्वाची वाटचाल सुरु होणार आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास त्याचबरोबर इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासह पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त आणि सुळकूड मार्गी लागेपर्यंत कृष्णा योजनेचे बळकटीकरण करुन पाणीटंचाई भासू देणार नाही याची निश्चितपणे काळजी घेऊ, असेही डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले. माझ्या या जीवनातील महत्वाकांक्षी नव्या राजकीय वाटचालीत सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सौ. किशोरी आवाडे आणि सौ. मौश्मी आवाडे यांचे पाठबळ मोलाचे ठरले आहे. त्याचबरोबर सर्व आवाडे समर्थक व आवाडे कुटुंबियांवर प्रेम करणार्‍या सर्वांच्या आशिर्वादाने मी निश्चितपणे विधानसभेत जाणार असल्याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज