sangli vidhansabha congress news : सांगलीतील काँग्रेस उमेदवारीचा घोळ आज मिटणार

SHARE:

वरिष्ठ नेते करणार आ.कदम, खा. पाटलांबरोबर चर्चा

जनप्रवास । सांगली

sangli vidhansabha congress news : सांगलीतील काँग्रेस उमेदवारीचा घोळ आज मिटणार : सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ बुधवारी मुंबईत मिटण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रदेश काँग्रेसचे नेते हे आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळेे सांगलीचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

sangli vidhansabha congress news : सांगलीतील काँग्रेस उमेदवारीचा घोळ आज मिटणार

सांगली विधानसभेसाठी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना तिसर्‍यांदा पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ मिटविण्यास पक्षातील नेत्यांना यश आले नाही. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. या दोघांमधील वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यावर दिली होती. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा केली.

एकाला विधानसभेची उमेदवारी तर दुसर्‍याला विधान परिषदेवर संधी, अशी ऑफर देत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, पण हा वाद मिटला नाही. पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील या दोघांनीही विधानसभा लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हा वाद आता प्रदेश पातळीवर मिटवला जाणार आहे. त्यासाठी चर्चा होणार होती. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गट यांच्यात जागा वाटपावरून बिनसले होते. दोन दिवस जागा वाटपाचा वाद मिटत नव्हता. त्यामुळे सांगली विधानसभेच्या जागेवर अद्याप चर्चा झालीच नाही.

प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेच्या काही उमेदवारांची यादी तयार केली आहे. सांगलीमध्ये काँगे्रेसचा वाद असल्याने पहिल्या यादीत काँग्रेसचे नाव नाही. जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेते प्रयत्न करणार आहेत. बुधवारी या संदर्भात मिटिंग देखील होणार आहे. आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याशी प्रदेश नेते चर्चा करून सांगलीच्या उमेदवारीचा घोळ संपविणार आहेत.

जयश्रीताईंच्या ‘फस्ट अँड लास्ट’मुळे अडचण…

सांगलीसाठी पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील इच्छूक आहेत. गेल्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी निवडून लढविली होती. त्यावेळी त्यांना जयश्रीताईंना यावेळी मी पुढच्यावेळी तुम्ही अशा शब्द दिला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय जयश्रीताई पाटील देखील यावेळी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रदेश व जिल्हा नेत्यांची देखील अडचण झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *