sangli vidhansabha bjp news : पुलकरी आ. गाडगीळ : सांगली जिल्ह्याने चार वेळा राज्याला मुख्यमंत्रीपद दिले. अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री दिले. परंतु सांगलीचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. परंतु गेल्या 10 वर्षाच्या काळात आता सांगलीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे ती आ. गाडगीळांनी केलेल्या विकासकामांमुळे.
sangli vidhansabha bjp news : पुलकरी आ. गाडगीळ
रस्ते आणि पुल शिवाय शहराची प्रगती होणार नाही. दळणवळण म्हणजे शहराच्या रक्तवाहिन्या आहेत. हे पहिल्यांदा ओळखले ते आ. गाडगीळ यांनीच. त्यामुळेच त्यांनी सांगलीचा विकास व्हायचा असेल तर सांगली शेजारील असणारे गावे एकमेकांना चांगल्या रस्त्यांने जोडले गेले पाहिजेत. शहरातील उपनगरांत जाण्यासाठी चांगले रस्ते, पूल हवेत हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच त्यांनी आयर्विन पुलावर पर्यायी पूल, हरिपूर कोथळी पूल, चिंतामणीनगर पूल, सह्यादीनगरचा पूल आणि विश्रामबागचा उड्डाण पूल यासाठी पाठपुरावा करून ही सर्व कामे तयार करून घेतली.
हरिपूर कोथळी पुलामुळे कोल्हापूर जिल्हा आणखी जवळ जोडला गेला. कोथळी, उमळवाड, दानोळी येथील ताजा भाजीपाला सांगलीत येवू लागला. अंकलीवरून जाण्यापेक्षा हरिपूर पुलावरून जाण्यासाठी लोकांचा वेळ वाचू लागला. लोकांची रहदारी वाढली. शेजारच्या गावातील भाजीपाला सांगलीत येवू लागला. त्यामुळे शेतकर्यांचा याचा आधार झाला.
सह्याद्रीनगरच्या पुलामुळेही सांगलीच्या उपनगरात जाण्यासाठी लोकांची चांगले सोय झाली. विश्रामबाग ते कुपवाड लक्ष्मी देवूळ हा रहदारीचा रस्ता त्यातच या रस्त्यावर रेल्वे रूळ त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. आमदार गाडगीळ यांनी पाठपुरावा करून पोलीस मुख्यालय समोर उड्डान पूल बांधून घेतले. त्यामुळे सांगलीची शोभा वाढली. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.
सांगलीचे पर्यटन स्थळ म्हणजे आयर्विन पूल. परंतु या पुलाला धोका निर्माण झाला आहे. हे ओळखून गाडगीळांना त्या पुलाजवळच नवा पर्यायी पूल बांधून घेतला. त्याचे आता शेवटच्या टप्प्यात काम सुरू आहे. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास आणखी मदत होणार आहे.
अशा या सांगलीत झालेल्या सहा पुलांमुळे पुलकरी गाडगीळ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.